सुदृढ समाजासाठी माजी सैनिकांचे योगदान मोलाचे

Date:

  • खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

कोल्हापूर: निर्व्यसनी युवा पिढी,सशक्त आणि शिस्तबद्ध समाज बनवण्यासाठी माजी सैनिक मोठे काम करू शकतात. समाजभान असणारी तरुणाई बनवण्याचे कार्य सैनिकांकडून चांगल्या प्रकारे होऊ शकते. असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कणेरी मठामध्ये पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार (ता.३)पासून होणार आहे.अधिवेशनापूर्वी मान्यवरांसोबत चहापानाचा कार्यक्रम कणेरीमठामध्ये आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार महाडिक म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी सैनिक बलिदानही देतात. युद्धामध्ये त्यांचे रक्त सांडते त्यातूनच रक्ताचे नाते तयार होते.निवृत्तीनंतरही निर्व्यसनी तरुणाई,सुदृढ आणि सशक्त समाज निर्माण करण्यासाठी ते मोलाचे योगदान देऊ शकतात. पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या माध्यमातून होणारे हे कार्य कौतुकास्पद आहे.अग्निवीर सारख्या योजनांमधून केवळ रोजगार निर्मिती होत नाही तर समाजामध्ये प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध युवा निर्माण होत आहे.” खासदार श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, “जगामध्ये दीर्घकाळ अहिंसा टिकावी यासाठी थोडी हिंसा होते. म्हणूनच लष्कर सैन्य आवश्यक असते.माजी सैनिकांचे प्रश्न सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.चार वर्षाची सेवा बजावून आलेल्या अग्निवेरांचे पुनर्वसन करणे देखील महत्त्वाचे आहे. मराठा लाईफ इन्फंट्री आणि छत्रपती घराणे यांचे अत्यंत जवळचे संबंध असून आम्ही सैनिकांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे.”
यावेळी श्रीमती निवेदिता माने माजी खासदार यांनी या सैनिक संघटनेच्या कामाचे कौतुक केले.अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे सैनिक आणि सैन्य परिवार या साठी करत असलेले काम पुढेही असेच चालू रहावे असे उद्गार काढले.
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी परिषदेच्या कामाचे महत्त्व आणि संघटनेची माहिती यावेळी दिली.

सर्व मान्यवरांनी इतक्या शिस्तबद्ध आयोजना बद्दल एअर मार्शल प्रदीप बापट,कार्यक्रम संयोजक अध्यक्ष कर्नल विलास सुळकुडे, जिल्हा सचिव नायक अण्णासाहेब कुंभार यांचे कौतुक केले.

यावेळी अखिल भारतीय पूर्वसैनिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी (निवृत्त),कर्नल विलास सुळकुडे (निवृत्त),सौ उमा सुळकुडे मॅडम,नायक आण्णासाहेब कुंभार,सचिव ,कोल्हापुर जिल्हा,रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए मुख्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आदरांजली

पिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान...

फ्रिंज एरिया’तील रहिवासी विकासाचा मार्ग मोकळा; ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय!

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसह ७ नगरपरिषदा व २ नगरपंचायतींलगतच्या...

भाजपा नगरसेवकाचा संताप, म्हणाले,‘वर्कस्टॉप’नंतरही कोथरूडमध्ये बांधकाम सुरू कसे राहते ?

बांधकाम विभागाच्या बिल्डर धार्जिण्याधोरणामुळे बिल्डर बसलेत डोक्यावर - यशोदा डेव्हलपर्सच्या...