पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पाच जणांकडून ४ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे जप्त

Date:

सहकारनगर परिसरात युनिट-२ची कारवाई; सुमारे १.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ने सहकारनगर परिसरात कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याची किंमत सुमारे १ लाख ६१ हजार २०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा युनिट-२चे अधिकारी व कर्मचारी प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि उज्ज्वल मोकाशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत सहकारनगर परिसरातील वनशिव वस्ती येथे काही संशयितांकडे अग्निशस्त्रे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई केली.

या कारवाईत सुफियान बशीर शेख (वय २२), निलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१), तुकाराम बाबासाहेब गवते (वय १९), ऋषभ ऊर्फ ऋषी शिवाजी भगत (वय २३) आणि अमित राजाराम पिलावरे (वय २५) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चार पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८८/२०२६ नोंदविण्यात आला असून, शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार पुढील कारवाई सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, तसेच शिवानंद कायगुडे, उज्ज्वल मोकाशी, शंकर नेवसे, कुंदन शिंदे, नागनाथ राख, विनोद चव्हाण, संदीप शिर्के, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, ओंकार कुंभार, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार आणि विनायक वगारे यांच्या पथकाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे स्टेशन बसस्थानकातील सुविधांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी

स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार; हयगय खपवून घेणार नाही—...

विश्रांतवाडी जंक्शनवरील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर डिसेंबरअखेर पूर्ण करा – आयुक्त नवल किशोर राम

मुकुंदराव आंबेडकर चौकातील कामाची पाहणी; मंदिरांचा अडथळा, वाहिन्यांचे स्थलांतर...