भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक सीए प्रतीक कर्पे यांची मागणी

Date:

मुंबई –
भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विहिरी, तलाव व झरे यांसारख्या पारंपरिक जलस्रोतांचे जतन आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सर्व जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप नगरसेवक व मुंबई भाजप सचिव सीए प्रतीक कर्पे यांनी महापालिकेकडे ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

वाढते शहरीकरण आणि भूजल पातळीतील घट यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सॅटेलाईट मॅपिंग च्या साहाय्याने जलस्रोतांचे सर्वेक्षण करून अचूक जीपीएस को-ऑर्डिनेट्स निश्चित केले जावेत, जीआयएस आधारित ‘डिजिटल वॉटर मॅप’ तयार करून सर्व विहिरी व तलावांची माहिती एका व्यासपीठावर आणावी आणि आयओटी सेन्सर्सद्वारे पाण्याच्या पातळीवर व गुणवत्तेवर २४ तास देखरेख ठेवण्यासाठी ‘स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग डॅशबोर्ड’ विकसित केला जावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बिगर-पिण्याच्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर वाढेल, भूजल पुनर्भरणाला चालना मिळेल आणि भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात स्थानिक पातळीवर पाण्याचा साठा तात्काळ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत नगरसेवक सीए प्रतीक कर्पे यांनी महापालिका आयुक्तांनी यावर त्वरित धोरण आखून अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या उत्सवाची सुरुवात

ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर वासा पूजन; श्री गणेश सुवर्णधाम’...

‘स्वराज्य टिकावे आणि सुराज्य घडावे यासाठी वंदे मातरम…’

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कथन केला राष्ट्र...

पुण्यातील टेकड्यांवर बांधकाम विभागाचा’निवासी निवासी’चा खेळ

तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ७ 'क प्रत' आणि...