महात्मा गांधी सप्ताहाचे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

Date:

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि कार्याचा नव्या पिढीला परिचय व्हावा, तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे दि. १ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे दिवंगत अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे यंदाचे १५वे वर्ष आहे. या सप्ताहात विविध प्रबोधनात्मक, वैचारिक, मनोरंजनात्मक आणि माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी विश्वस्त रमेश आढाव, लक्ष्मीकांत देशमुख, युक्रांद पुणे शहरचे संघटक तेजस भालेराव, विश्वस्त सचिव अन्वर राजन उपस्थित होते.

या सप्ताहात पर्यावरण, सामाजिक चळवळी, लोकशाहीसमोरील आव्हाने, चित्रपट व चर्चा, गांधी विचार आणि काव्य अशा विविध विषयांवरील व्याख्याने व कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ लेखक व पत्रकार अंबरिश मिश्र, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, तुषार गांधी, विवेक सावंत, सुषमा अंधारे, माधव भंडारी, विकास लवांडे, प्रशांत जगताप, श्रावणी बुवा, अक्षय कांबळे, पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक वरूण सुखराज, बँकिंगतज्ञ देविदास तुळजापुरकर हे विविध दिवशी सहभागी होत आहेत.

गांधी सप्ताहाचे उद्घाटन गुरुवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता ज्येष्ठ पत्रकार, लेखक व साहित्यिक अंबरिश मिश्र यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी सर्वधर्म प्रार्थना केली जाईल त्यानंतर ‘एक थेंब गांधी’ या विषयवार त्यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव कदम राहणार आहेत.

या सप्ताहात शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर सकाळी ८.३० वाजता गांधी जयंती व जागतिक अहिंसा दिनानिमित्त गांधी भवन येथे प्रार्थना व भजनाचा कार्यक्रम ज्येष्ठ गायिका शुभांगी मुळे व सहकलाकार सादर करतील. सकाळी ९ वाजता डेक्कन येथील मक्केशाह मस्जिद आणि पांचाळेश्वर मंदिर ते गांधी भवन असा शांतता मार्च आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वांसाठी प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे व्याख्यान ‘आमचे आंदोलनातील अनुभव’ या विषयावर होणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे सल्लागार विवेक सावंत हे ‘तरुणांपुधील आव्हाने’ यांवर मार्गदर्शन करतील. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख भूषवतील.

रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता जादूचे प्रयोग जादुगार संजय रघुवीर सादर करतील. या प्रसंगी प्रमुख पाहुणे राजीव तांबे असणार आहेत. तसेच सायंकाळी ५.३० वाजता लोकशाही समोरील आव्हाने या विषयावरील परिसंवादात सुषमा अंधारे, माधव भंडारी, विकास लवांडे, प्रशांत जगताप, श्रावणी बुवा, अक्षय कांबळे हे सहभागी होत आहेत.

सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता चित्रपट लेखक व दिग्दर्शक वरूण सुखराज आणि बँकिंगतज्ञ देविदास तुळजापुरकर हे ‘द ग्रेट इंडियन इल्युजन डॉक्युमेंटरी’ सादरीकरणावर संवाद करणार आहेत. अध्यक्षस्थानी ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक अनंत बागाईतकर असतील.

मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर ‘पोरके पर्यावरण’ या विषयार व्याख्यान सादर करतील. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त तुषार गांधी असतील.

बुधवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता समारोप समारंभात वैचारिक कवितांचा कार्यक्रम सादर होईल.

या सप्ताहाच्या निमित्ताने गांधी भवनच्या आवारात दि. १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ३.०० वाजता आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या नेत्यांचे चित्रपट (बायोपिक), प्रबोधन, मनोरंजन व माहितीपर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, चित्रपटांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत खादी, पुस्तके, हातमाग तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्सही उपलब्ध असणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज-कोंढवा रस्त्याचे ५० मीटर रुंदीकरण मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांचे निर्देश

पुणे : कात्रज-कोंढवा परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कात्रज-कोंढवा...

जागतिक हृदय दिनानिमित्त पुणे महापालिकेत CPR प्रशिक्षण व प्रात्यक्षिक

अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराच्या रुग्णाला तातडीची मदत देण्याचे प्रशिक्षण पुणे...

बनावट पुराव्यांमुळे आरोपीला जवळपास 10 वर्षे तुरुंगवास

पुणे सत्र न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यावर गंभीर ताशेरे; कारवाईचे निर्देश,...