पंढरपूर यात्रेचे नियोजन ठरले कौतुकास्पद; मंत्री जयकुमार गोरे यांचा राजा माने यांच्या हस्ते सत्कार

Date:

सातारा | प्रतिनिधी

पंढरपूरची आषाढी यात्रा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा असताना, या यात्रेचे नियोजन सुरळीत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आले. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच यात्रा काळात सुरक्षितता आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आले. या यशस्वी नियोजनाबद्दल पंचायत राज व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करत अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी बोराटवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज माने यांच्या वतीने मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला.

पंढरपूर यात्रेदरम्यान राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, निवास, पाणी, आरोग्य तसेच इतर मूलभूत सुविधांचे योग्य नियोजन करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून यात्रा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले.

मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी झालेल्या या सदिच्छा भेटीत राज्यातील विविध विकासकामे, ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणारी गती तसेच डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. बदलत्या काळात डिजिटल पत्रकारिता अधिक प्रभावी होत असून, ग्रामीण आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यात डिजिटल माध्यमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, महासचिव विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पाणसंडे, सचिव लिंगराज साखरे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे तसेच डॉ. संतोष जोगदंड उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत संघटनेच्या आगामी उपक्रमांसह पत्रकार आणि डिजिटल मीडिया क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवरही विचारविनिमय झाला. भेटीमुळे संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादाला अधिक बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्तीची रक्कम बँकांच्या कर्जखात्यात...

वीज कर्मचाऱ्यांनी सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षा साधनांचा वापर केलाच पाहिजे – राजेंद्र पवार

महावितरण पुणे परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांना संचालक राजेंद्र पवार यांच्या...