‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री एक भीषण अपघात-तरुण नेत्याचा मृत्यू

Date:

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री एक भीषण अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने एका मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील एका युवा उद्योजक नेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील(Mumbai-Pune Expressway) मिसिंग लिंक बोगद्यात (Missing Link Tunnel) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील तरुण नेते तुषार भूमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य तिघे जण सुदैवाने बचावले आहेत. अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर आणि मालवाहू टेम्पो या दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.फॉर्च्युनरमधील सर्व पाच जण हे पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे पथक, देवदूत यंत्रणा आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची तीव्रता जास्त असल्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या मधोमध अडकली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने मिसिंग लिंकमधून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल दोन ते तीन तास पूर्णपणे बंद ठेवली होती. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने, मुंबईकडे जाणारी वाहतूक तातडीने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळवण्यात आली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार आणि टेम्पो बाजूला हटवले. नंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरोपींची धिंड काढून सोशल मिडीयावर बढाया:पुणे पोलीस आयुक्तांची सर्व पोलीस ठाण्यांना तंबी

पुणे- आरोपींचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना ,आरोपी किंवा गुन्हेगार...

अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी

पुणे: राज्यशासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अनुसूचित...

‘कचऱ्यावर भूमिग्रीनचा हत्ती पोसू नका’; स्थायी समिती सभागृहाबाहेर अरविंद शिंदेंचे आंदोलन

₹९६७ प्रतिटन दर स्वीकारल्याने सात वर्षांत पुणेकरांचे सुमारे ₹५००...