आयआयएमसी द्वारे इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमांसाठी 13 ऑगस्ट रोजी थेट प्रवेश प्रक्रियेचे आयोजन

Date:

नागपूर, 6 ऑगस्ट 2026

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन म्हणजेच आयआयएमसी, अमरावती कॅम्पस, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांमधील रिक्त जागांसाठी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून स्पॉट ॲडमिशन म्हणजे थेट प्रवेश प्रक्रिया राबवणार आहे. जागांची उपलब्धता आणि विहित आरक्षण धोरणाच्या अधीन राहून गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिले जातील.

‘मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम’ (सीओक्यूपी17) या विषयांतर्गत सीयुईटी (पीजी) 2026 परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या  उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्ता क्रमांकांनुसार प्रवेशासाठी विचार केला जाईल.

जे पात्र उमेदवार सीयुईटी (पीजी) 2026 परीक्षेला बसू शकले नाहीत, परंतु ज्यांनी कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळवले आहेत,ते देखील या थेट प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. अशा उमेदवारांना 13 ऑगस्ट रोजी लेखी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना गुणवत्ता आणि लागू असलेल्या आरक्षण नियमांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 25 वर्षे, इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी उमेदवारांसाठी 28 वर्षे आणि अनुसूचित जाती जमाती अर्थात एससी/एसटी  व दिव्यांग उमेदवारांसाठी 30 वर्षे इतकी आहे.

इच्छुक उमेदवारांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, स्व-साक्षांकित छायाप्रती, पासपोर्ट-आकाराचे फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह आयआयएमसी अमरावती कॅम्पस येथे उपस्थित राहावे.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी, उमेदवार आयआयएमसी  अमरावती कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. प्रवेशाशी संबंधित चौकशीसाठी डॉ. राजेश सिंग कुशवाह (9415862377), डॉ. विनोद निताळे (9860046706), रोहन तायडे (8275734035) किंवा कार्यालयाशी (0721-2668180) संपर्क साधता येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

३६ देशांतून २७४ फरार आरोपी भारतात; १८ हजार ७६२ कोटी रुपये परत मिळवल्याचा केंद्राचा दावा

२०१९ ते जुलै २०२६ दरम्यान प्रत्यार्पण आणि अन्य प्रक्रियेतून...

शहरातील डोंगरउतार, माथे आणि टेकड्या निवासी कशा दाखवल्या? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार—श्रीनाथ भिमाले

टेकडीफोड प्रकरणांची चौकशी करा,शहरातील सर्व टेकड्यांसाठी संरक्षण आराखडा तयार...