रस्त्यावर राडारोडा टाकल्यास १० हजारांचा दंड; माहिती देणाऱ्याला ५ हजारांचे बक्षीस

Date:

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठराव; बेकायदेशीर राडारोड्याविरोधात विशेष मोहीम राबविण्याची मागणी

पुणे, दि. ५ ऑगस्ट — माय मराठी प्रतिनिधी

शहरातील सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर बेकायदेशीरपणे बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्या वाहनमालकांवर किमान १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, तसेच पुराव्यासह संबंधित वाहन पकडून देणाऱ्या नागरिकाला प्रति वाहन पाच हजार रुपयांचे बक्षीस द्यावे, असा ठराव पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.

पुणे शहराचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असला, तरी घनकचरा आणि बांधकाम राडारोडा व्यवस्थापनामध्ये शहर मागे पडत असल्याचे या ठरावात म्हटले आहे. प्रशासकीय दुर्लक्ष आणि अशास्त्रीय पद्धतीने होणाऱ्या राडारोडा व्यवस्थापनामुळे शहरातील अनेक रस्ते, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे राडारोडा टाकला जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक जागांवर टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होण्याबरोबरच पुण्याच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशा वाहनांविरोधात विशेष अभियान राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणाऱ्या वाहनमालकावर किमान १० हजार रुपयांचा दंड आकारावा. महापालिकेच्या आरोग्य विभागाला वाहन क्रमांक, छायाचित्रे किंवा व्हिडिओसारख्या पुराव्यांसह माहिती देणाऱ्या नागरिकास प्रति वाहन पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात यावे, असे ठरावात सुचविण्यात आले आहे.

या योजनेसाठी महापालिका आयुक्तांनी तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. नागरिकांचा सहभाग वाढल्यास सार्वजनिक ठिकाणांवरील राडारोड्याचे प्रमाण कमी होऊन शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

हा प्रस्ताव सूरज नथुराम लोखंडे यांनी मांडला असून, हिमाली संतोष डोख आणि गौरव गणेश घुले यांनी त्याला अनुमोदन दिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विषारी दारूप्रकरणी दत्ता लोंढेच्या टोळीवर ‘मकोका’

हडपसर, दापोडी आणि फुगेवाडीतील २१ जणांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सीआयडीची...

पुण्यात ‘पुणे विरोधी पक्षनेते संघटना’ स्थापन; शहराच्या प्रश्नांसाठी माजी विरोधी पक्षनेते एकत्र

महापालिकेतील ३१ माजी विरोधी पक्षनेत्यांपैकी २२ जण हयात; प्रारंभिक...

इंदोरच्या कुमेडी मल्टीमोडल बस टर्मिनलचे संचालन बीव्हीजी इंडियाकडे

बस, मेट्रो आणि रेल्वेची जोडणी असलेल्या टर्मिनलमधून दररोज ५०...

आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

संशोधन आधारित उपक्रम व विद्यार्थी केंद्री शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य-कुलगुरु...