पुण्यातील काही भागांचा 5 ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत पाणीपुरवठा बंद; 6 ऑगस्ट रोजी सकाळी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता

Date:

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून एस.एस.डी.टी. (एम.एल.आर.) झोनच्या डिलिव्हरी साईडवरील प्रमुख व्हॉल्व्हची तातडीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने (५ ऑगस्ट) दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच ६ ऑगस्ट रोजी सकाळचा पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख भाग :एस.एस.डी.टी. (एम.एल.आर.) झोनअंतर्गत लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शिला विहार कॉलनीअंध सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, तुळशीबाग कॉलनी परिसर, सहवास, विश्वास, मनोहर सोसायटीविठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, डी.पी. रस्ता (भाग), मयूर कॉलनी, कर्वेनगरएरंडवणे, नळस्टॉप, सहकार वसाहत, भारतनगर, अभिनवनगरडेक्कन परिसर, हिमाली सोसायटी, वारजे परिसरातील काही भागतसेच औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, खडकी, चतु:शृंगी टाकी परिसर, औद्योगिक वसाहतीसह संबंधित भाग.महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी काही भागात कमी दाबाने किंवा उशिरा पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

मुंबई:. ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं...

सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र,हर्षवर्धन सपकाळ यांनी शब्द मागे घेऊन माफी मागावी

पुणे | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

होय… MH 12 च; पुण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी गडकरींची सकारात्मक ग्वाही – मुरलीधर मोहोळ

MH 12 कोड बदलू नये यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर...