अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

Date:

मुंबई:. ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे.वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती बॉलिवूड अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली आहे. प्रदीप रावत यांनी केवळ बॉलिवूडच नव्हे तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपल्या प्रभावी अभिनयाची छाप पाडली होती. प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारून केली होती. त्यानंतर त्यांच्या इतरही भूमिका खूप गाजल्या.

लगानमधील प्रदीप रावत यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘आपला ‘गजनी’, ‘लगान’मधील देवा प्रदीप रावत आता आपल्यात नाही. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’ एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना अभिनेत्री रोशनी अचरेजा यांनी प्रदीप रावत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. रोशनी यांनी सांगितले की, ‘प्रदीप रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ऐतबार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अग्निपथ, पत्थर के फूल, संगदिल सनम, कोयला, सरफरोश आणि लगान यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, त्यांना खरी लोकप्रियता ‘गजनी’ चित्रपटामुळे मिळाली. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ चित्रपटात प्रदीप रावत यांनी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले होते आणि ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र,हर्षवर्धन सपकाळ यांनी शब्द मागे घेऊन माफी मागावी

पुणे | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

होय… MH 12 च; पुण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी गडकरींची सकारात्मक ग्वाही – मुरलीधर मोहोळ

MH 12 कोड बदलू नये यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर...