भारतीय तटरक्षक दलाने केली पूरग्रस्त भागांत अडकलेल्या 170 जणांची सुटका

Date:

मुंबई- भारतीय तटरक्षक दलाने नागरी प्रशासनाच्या निकट समन्वयासह 22 जुलै 2026 च्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या 11 बचाव मोहिमांद्वारे दमण, दादरा आणि नगर हवेली तसेच दक्षिण गुजरातच्या पूरग्रस्त भागांत अडकलेल्या 170 जणांची सुटका केली. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत प्रतिकूल हवामान अशा परिस्थितीत या मोहिमा राबवण्यात आल्या.

या बचाव कार्याची सुरुवात 22/23 जुलैच्या रात्री झाली. सुरुवातीला सिल्वासा येथील खानवेलमधून पाच जणांची सुटका करण्यात आली, त्यानंतर कडैया किनारपट्टीच्या भागात पूरग्रस्त नदीकाठावर अडकलेल्या तीन मच्छिमारांना बाहेर काढण्यात आले. सर्वात मोठ्या बचाव मोहिमांपैकी एका मोहिमेत 23/24 जुलैच्या रात्री पुरामुळे रस्ते संपर्क पूर्णपणे विस्कळीत झालेल्या वेल्सपन औद्योगिक क्षेत्रात अडकलेल्या 60 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.त्यानंतर, एरो फायबर प्रा. लि. जवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधून सात जणांची सुटका, डोंगरीमधून दहा जणांना बाहेर काढणे, वलसाड-पर्डी परिसरातून अडकलेल्या चार जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका आणि रिलायन्स इंडस्ट्रीज परिसरातून रातोरात आठ जणांना बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.आणखी एका महत्त्वपूर्ण बचाव मोहिमेत, तटरक्षक दलाने अवध सोसायटी परिसरातून दहा जणांना बाहेर काढले, यामध्ये नऊ महिन्यांची गर्भवती महिला आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या एका महिलेचा समावेश होता. या दोघींना वेळेत वैद्यकीय सेवा मिळेल, याचीही व्यवस्था करण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी 24 जुलै रोजी नवसारी जिल्ह्यातील मेंदर गावातून 33 अडकलेल्या व्यक्तींना यशस्वीरित्या बाहेर काढले. यात छातीत तीव्र वेदना होत असलेल्या एका व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीला तातडीची वैद्यकीय मदतही पुरवण्यात आली.मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह आणि धोकादायक परिस्थिती असूनही, तटरक्षक दलाच्या जवानांनी आपल्या दलाच्या ‘वयम रक्षमः’ (आम्ही रक्षण करतो) या ब्रीदवाक्याला जागत, बचाव कार्य अविरतपणे सुरू ठेवले.

भारतीय तटरक्षक दल नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे आणि सध्याच्या पूर परिस्थितीमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी उच्च पातळीवरील कार्यक्षम सज्जता कायम ठेवत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तीन हजार लिटर डिझेलऐवजी निव्वळ पाण्याची वाफ: भारताच्या हायड्रोजन रेल्वेची यशोगाथा

मुंबई- दिल्लीजवळील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान 17 जुलै 2026...

डॉ. कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत नेण्याचे काम केले – शरद पवार

गांधींचा विचार वाचवला पाहिजे पुणे: 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी' ची...

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोतातडीने सुरू करा,उदघाटनाचा सोहळा नंतर करा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : आयटी कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात साताऱ्यात नागरिकांना दिलासा; डॉ. नीलम गोऱ्हेंकडून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

साताऱ्यात शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा.दि.२६: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन...