दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२६; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. २१: भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात येणार असून, त्यासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, संघटना तसेच संबंधित घटकांकडून ऑनलाइन अर्ज व नामांकन मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण डॉ. राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरू झाली असून, विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या अर्ज व नामांकनांचा विचार करून वर्ष २०२६ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. अर्ज राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, प्रत्यक्ष अथवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्जदारांनी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यानुसार सर्व माहिती अचूकपणे भरावी. तसेच, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण कार्याचा वर्णनात्मक तपशील नमूद करून त्यासंबंधीची आवश्यक सहाय्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत.

राष्ट्रीय पुरस्कारांसाठी सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन आणि श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या उप-श्रेणींमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या उप-श्रेणीसाठी अर्ज करताना यूडीआयडी कार्ड अथवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांसाठीची पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांची सविस्तर माहिती https://depwd.gov.in आणि https://awards.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असून, इच्छुकांनी त्याचा संदर्भ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असेही डॉ. देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधी -प्रियांकांसह अनेक खासदारांची धरपकड

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर...

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती

महाविद्यालयीन विद्यार्थी गणना पत्रे तपासणी, पडताळणी, नावे शोधणे व...

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ पुणे,...

सुरक्षा रक्षक नियुक्त्यांसाठी दबाव कोण आणतो, आणि प्रशासन तो दबाव का सहन करते?

माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी...