विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती

Date:

महाविद्यालयीन विद्यार्थी गणना पत्रे तपासणी, पडताळणी, नावे शोधणे व डिजिटल नोंदणी प्रक्रियेत बजावताहेत महत्त्वपूर्ण भूमिका

पुणे, दि. २१ : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, गणना पत्रांची छाननी, माहितीची पडताळणी, डिजिटल नोंदणी, दस्तऐवज तपासणी तसेच २००२ च्या मतदार यादीतील नावे शोधून मतदार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सहकार्य करण्याचे महत्त्वपूर्ण काम विद्यार्थी करत आहेत.

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी निवडणूक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारीने कार्यरत आहेत. प्राप्त झालेल्या गणना पत्रांवरील माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, माहिती संगणकीय प्रणालीत नोंदविणे, अर्जांचे वर्गीकरण करणे यासोबतच २००२ च्या मतदार यादीतील संबंधित मतदारांची नावे शोधून त्याची पडताळणी करण्यात मतदार व बीएलओंना मदत केली जात आहे. त्यामुळे मतदार नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि अचूक होत आहे.

युवकांच्या सहभागामुळे मोहिमेतील कामकाज अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने होत असून, निवडणूक यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अत्यंत जबाबदारीने आपली भूमिका बजावत असून, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी प्रक्रियेलाही गती देत आहेत.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक व्यवस्थेबाबत जागरूकता वाढत आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व, अचूक मतदार यादीची आवश्यकता आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका यांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत आहे. त्याचबरोबर मतदारांशी संवाद साधताना त्यांच्यात नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीवही अधिक दृढ होत आहे.

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, बीएलओ आणि स्वयंसेवी विद्यार्थ्यांचा समन्वय महत्त्वाचा ठरत असून, त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोहिमेला अधिक गती मिळत आहे. विशेषतः २००२ च्या मतदार यादीतील नावे शोधून देण्याच्या विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे मतदार पडताळणी प्रक्रिया अधिक परिणामकारक आणि सुलभ ठरत असल्याचे निवडणूक प्रशासनाने नमूद केले आहे
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ पुणे,...

सुरक्षा रक्षक नियुक्त्यांसाठी दबाव कोण आणतो, आणि प्रशासन तो दबाव का सहन करते?

माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी...