अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Date:

जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि.२१: महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार आहार मिळावा, यासाठी शाकाहारी (व्हेज) पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला असून खिचडीसोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीटही देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

महिला व बालविकास विभागाच्या सुधारित सूचनेनुसार पौष्टिक मूगडाळ खिचडी प्रीमिक्स हा पदार्थ कायम ठेवण्यात आला असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाणार आहे. पौष्टिक तूरडाळ खिचडी प्रीमिक्स ऐवजी आता व्हेज पुलाव उपलब्ध करण्यात येणार आहे. पौष्टिक बहुधान्य-प्रथिन मिश्रण पाककृती पूर्ववत राहणार असून, भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रण ऐवजी बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे. या सुधारित आहाराचा लाभ अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला व स्तनदा माता यांना मिळणार आहे.

महिला व बालविकास विभागाने घरपोच पोषण आहार योजनेतील पाककृतींमध्ये बदल करण्यामागे लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, रुचकर आणि स्वीकारार्ह आहार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता आहार आवडीने खावेत, यासाठी व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफ यांचा समावेश करण्यात आला आहे.
*श्रीमती अंकिता पाटील, सभापती, महिला व बालविकास समिती:
जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ४ हजार ३९५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत जवळपास १ लाख ६ हजार बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. माहे नोव्हेंबर व डिसेंबर-२०२६ महिन्यापासून सुधारित घरपोच पोषण आहाराचा पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक व चविष्ट आहार मिळावा, या उद्देशाने व्हेज पुलाव, मल्टीग्रेन न्युट्री पफ आणि स्वतंत्र मसाला पाकिटाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये या सुधारित ‘खाद्यसूची’नुसार पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती

महाविद्यालयीन विद्यार्थी गणना पत्रे तपासणी, पडताळणी, नावे शोधणे व...

सुरक्षा रक्षक नियुक्त्यांसाठी दबाव कोण आणतो, आणि प्रशासन तो दबाव का सहन करते?

माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी...