सिक्कीममध्ये निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन, 7 मजूर ठार:20 अजूनही अडकलेत; ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद

Date:

सिक्कीममध्ये सोमवारी एका बोगद्यावर भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले. त्यामुळे आत असलेले 27 मजूर अडकले. यापैकी 7 मजुरांचा मृत्यू झाला असून, 20 मजूर अजूनही अडकले आहेत.

नामची जिल्ह्यातील मामरिंग येथे असलेल्या समरदुंग बोगद्यात बांधकाम सुरू होते. जिल्हाधिकारी अनुपा तामलिंग यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेल्या मजुरांची नेमकी संख्या 27 पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.

बोगद्यात वायू असल्यामुळे मदत आणि बचाव कार्यात खूप अडचणी येत आहेत. अनेक बचाव कर्मचाऱ्यांना आत जाताना चक्कर आली आणि काहीजण बेशुद्धही पडले. त्याचा फटका बचाव कार्यावर बसला.
जिल्हाधिकारी तमलिंग यांनी सांगितले की, दुपारी 3:40 च्या सुमारास प्रशासनाला अपघाताची माहिती मिळाली, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी पोहोचली.

बोगद्यात पटेल इंजिनिअरिंगचे 21 आणि एनएचपीसीचे 6 असे एकूण 27 मजूर अडकल्याची भीती आहे. पश्चिम बंगालमधूनही गॅस-प्रतिरोधक उपकरणांसह एक विशेष बचाव पथक आणले आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, बोगद्यात मिथेन वायू, कमी जागा आणि अपुऱ्या प्रकाशामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. सध्या सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढणे ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे.

ॲम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आली आहे आणि गॅस मास्क घालून बचाव पथक मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हा बोगदा तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पासाठी पटेल इंजिनिअरिंग कंपनी बनवत होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील सुरक्षेवरून सत्ताधाऱ्यांच्या नाराजीवर सभागृहात शाब्दिक चकमक

पुणे- महापालिकेत सभागृहाच्या दारापर्यंत येऊन राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन...

पुणेकरांचे ५६७ कोटी वाचवा,ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढा

अरविंद तुकाराम शिंदे यांचा स्थायी समितीत ठराव; रामचंद्र ऊर्फ...