हडपसर परिसरात पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Date:

पुणे, दि. २० जुलै : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने हडपसर परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करत सुमारे २०० चौरस फूट क्षेत्रातील पत्रे स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम हटविले. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (२० जुलै) सकाळी ९ वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बांधकाम विकास विभागाच्या अस्मिता फूटे (कनिष्ठ अभियंता), श्रीकांत बनसोडे (कनिष्ठ अभियंता), श्री. अनिल कामठे (उप अभियंता) तसेच इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. कारवाईदरम्यान पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलिसांचे मनुष्यबळ, एमएसएफ जवान, जेसीबी, रेस्क्यू वाहन, ब्रेकर आणि बिगारी सेवक यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. यावेळी उपआयुक्त सोमनाथ बनकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पुणे महानगरपालिकेचा विकास आराखडा (डीपी) मंजूर नसलेल्या किंवा बेकायदेशीर प्लॉटिंगमधील जागा खरेदी करून त्यावर अनधिकृत बांधकाम करू नये. अशा प्रकारची बांधकामे आढळल्यास पुणे महानगरपालिकेमार्फत नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या अनोख्या उपक्रमाची ‘एशिया बुक...

शांतता क्षेत्रात कायद्याची कडक अंमलबजावणी :पोलीस आयुक्तांचे आश्वासन.

उत्सवांना नव्हे तर गोंगाटाला विरोध असल्याने कायद्याचे पालन करणाऱ्या...

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

भूसंपादनाची ६० ते ७० टक्के प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...

पीक कर्ज वाटपाला गती देऊन उद्दिष्टपूर्ती करा – अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

पुणे, दि. १७ : जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उर्वरित...