स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेत १५ दिवसीय विशेष स्वच्छता अभियान; महापौर मंजुषा नागपुरे यांचा पुढाकार

Date:

पुणे, दि. २० जुलै २०२६ :
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरभर १५ दिवसीय विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी आज महापौर मा. मंजुषा ताई नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, माजी महापौर, नगरसेवक, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, उपआयुक्त तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, “स्व. अजितदादा पवार यांनी सार्वजनिक स्वच्छतेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पुणे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविणे होय. ही मोहीम केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक पुणेकराची आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास स्वच्छतेचे हे लोकआंदोलन अधिक प्रभावी ठरेल.”

महापौरांनी प्रशासनाला शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत २२ जुलै २०२६ पासून १५ दिवसांचे विशेष स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागातून दैनंदिन नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, पदपथ, चौक तसेच क्रॉनिक स्पॉटची विशेष स्वच्छता करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, नागरिक, युवक मंडळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून ही मोहीम लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्यात यावी, तसेच घरातील टाकाऊ व खराब वस्तू संकलनासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या.

स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹५० लाख, द्वितीय क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹२५ लाख, तर तृतीय क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹१५ लाखांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वच्छतेबाबत निरोगी व सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल, कामकाजाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल आणि नागरिकांना अधिक स्वच्छ, सुंदर व दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध होतील. या माध्यमातून “स्वच्छ पुणे, सुंदर पुणे” हे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वास महापौर मा. मंजुषा ताई नागपुरे यांनी व्यक्त केला.

महापौरांनी अभियानाचा व्यापक प्रचार रेडिओ संदेश, होर्डिंग्ज, फलक व जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात यावा. त्यामध्ये “पुणे प्रथम” हा लोगो वापरण्यात यावा , तसेच स्वच्छता कामगारांसाठी आवश्यक सुरक्षासाहित्य, हातमोजे, फवारणी यंत्रे व इतर साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

यावेळी महापौरांनी स्पष्ट केले की, या अभियानासाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी करावी आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी पुणे घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व पुणेकरांना या विशेष स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छ, सुंदर, हरित आणि निरोगी पुणे घडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांचे ५६७ कोटी वाचवा,ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढा

अरविंद तुकाराम शिंदे यांचा स्थायी समितीत ठराव; रामचंद्र ऊर्फ...

सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांचे जोरदार आंदोलन

पुणे-लडाखचे पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने पोलिसांच्या...

महापालिका प्रशासनात आता तरुणाईचा थेट सहभाग

नगरसेवक तेजिंदर सिंगतिवाना यांच्या 'महापौर Gen Next Civic Fellows'...

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार मुंबई, दि. २० :...