पुण्यात गुन्हेगारी वाढली:तातडीने उपाययोजना करा: राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे पोलिस महासंचालकांना निवेदन

Date:


पुणे-पुणे शहर आणि उपनगरांमधील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. गृह खात्याने या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी, असे या शिष्टमंडळाने म्हटले. शुक्रवारी दाते यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात पुण्यातील महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची विक्री, कोयता गँगची दहशत, टोळीयुद्ध आणि वाढत्या वाहन अपघातांकडे लक्ष वेधण्यात आले. शहरातील बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, भवानी पेठ, येरवडा, वानवडी आणि सिंहगड रस्ता यांसारख्या परिसरात कोयता गँग सक्रिय असून, वाहनांची तोडफोड आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढल्याचे शिष्टमंडळाने नमूद केले.

पुण्यात होणाऱ्या ‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये अमली पदार्थांचा वापर वाढल्याने तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच, शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता, अपुऱ्या पोलिस मनुष्यबळावर चिंता व्यक्त करत पोलिस दलाची संख्या वाढवण्याची सूचनाही करण्यात आली.

पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी निवेदन वाचल्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांना दूरध्वनी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही दाते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश काकडे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, विशाल तांबे, काका चव्हाण, मनाली भिलारे, किशोर कांबळे, प्रवीण तुपे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे ग्रँड सायकल टूरच्या खर्चावर प्रश्नचिन्ह; रस्त्यांच्या कामांचा तपशील जाहीर करण्याची मागणी

१६७ कोटींच्या प्रस्तावित खर्चासह मार्ग, सरफेसिंग आणि मागील कामांच्या...

प्रत्येक मतदाराने SIR गणना पत्र वेळेत भरुन लोकशाही बळकट करावी!

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे...

घनकचरा विभागाचे नाव ‘भूमिग्रीन घनकचरा व्यवस्थापन विभाग’ करा!

पुणे महापालिकेच्या नाव समितीसमोर उपरोधिक प्रस्ताव; प्रशासन आणि कंपनीच्या...