पालखी सोहळ्यात चोरट्यांचा डाव; भाविकांच्या गळ्यातील दागिने लंपास

Date:

पालखी दरम्यान चोऱ्यांसह खून, मारहाण, फसवणूक आणि घरफोडीच्या १० गुन्ह्यांची नोंद

पुणे | प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असतानाच चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शनादरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांत नोंदविण्यात आल्या आहेत.

मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जुलै रोजी दुपारी सुमारास शेवाळेवाडी येथील कुमार मिडोज चौक परिसरात एक महिला संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि चेन असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद दाखल झाली आहे.

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० जुलै रोजी सकाळी भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे दर्शन घेत असताना एका महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात महिलेने जबरदस्तीने खेचून नेल्याची नोंद आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जुलै रोजी सकाळी गाडीतळ परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेत असताना फिर्यादी महिला आणि इतर ९ भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या घटनेत ३ लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद आहे.

या तीन पालखी-संबंधित घटनांमध्ये एकूण ५ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांच्या नोंदींवरून स्पष्ट होते.

याशिवाय विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकमान्यनगर परिसरात १० जुलै रोजी सायंकाळी एका ७० वर्षीय महिला पायी जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना नोंदली आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जुलै रोजी सकाळी स्वारगेटकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गाखाली एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची नोंद आहे. या प्रकरणी किरण उर्फ बिट्ट्या रवि वाघमारे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० जुलै रोजी रात्री मांगवाडा, गुजरात कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून चार अनोळखी व्यक्तींनी २६ वर्षीय फिर्यादीला शिवीगाळ, धमकी देत मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हडपसर पोलीस ठाण्यातील आणखी एका प्रकरणात ११ जुलै रोजी कामठे वस्ती, ब्रिज परिसरात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी विनोद तुळजाराम बंदीछोडे आणि पवन विनोद भारते यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पवन भारते याला अटक करण्यात आली आहे.

फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाइन टास्कद्वारे चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय व्यक्तीची ७ लाख १८ हजार ७६७ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. मोबाइलधारक, टेलिग्राम खातेधारक आणि लिंक वापरकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जुलै रोजी श्री समर्थ कॉम्प्लेक्स, नवले हॉस्पिटलसमोरील गेटजवळील फ्लॅटमध्ये घरफोडीची घटना घडली. घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून किचनमधील कपाटातून १ लाख ३९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दाखल आहे.

नऱ्हे पोलीस ठाण्यातील दुसऱ्या प्रकरणात ११ जुलै रोजी नवले ब्रिजकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत एका व्यक्तीला पोलीस असल्याचे सांगून मोबाइल घेतला. त्यानंतर फोनपेचा पासवर्ड घेऊन बँक खात्यातील १ लाख ३२ हजार ९५० रुपये दुसऱ्या खात्यावर वर्ग करण्यात आले, तसेच १० हजार रुपयांचा मोबाइल घेतल्याची तक्रार आहे. या घटनेत एकूण १ लाख ४२ हजार ९५० रुपयांची फसवणूक व चोरी झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असतानाही गर्दीचा फायदा घेत चेन स्नॅचिंग आणि दागिने चोरीच्या घटना घडल्या आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची टीका पुणे :...

चौकशीचा फार्स नको संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे

मोशी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी घेतली...

मोशी कचरा डेपो दुर्घटनेला प्रशासन, ठेकेदार आणि राजकारणी जबाबदार — ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर

पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप; संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची...

हेच का आपले स्मार्ट शहर..? पूररेषेतील एकही घर शिल्लक राहणार नाही; अशी ठोस कारवाई करा!

पूरग्रस्तांना दरवर्षी दिलासा; कायमस्वरूपी उपाय मात्र कधी? क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष...