खडकवासला धरण 76% भरले, मुसळधार पावसामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Date:

पुणे, दि. 07 जुलै 2026:
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी 10 वाजता 76 टक्के क्षमतेने भरले आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणात येवा येत आहे. पुढील काही तासांत धरणाची पाणीपातळी 80% पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना आवाहन:

  1. कोणीही नदीपात्रात उतरू नये. 2. नदीपात्रात असलेले साहित्य, वाहने व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. 3. मुठा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे.
    धरणातून विसर्ग सुरू झाल्यास पुण्यातील डेक्कन, सिंहगड रोड, वारजे, विठ्ठलवाडी, बाणेर-बालेवाडी भागातील नदीकाठच्या परिसरात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमेरिकेचा भारतीय गुंतवणूक असणाऱ्या चाबहार पोर्टवर हल्ला:कंट्रोल टॉवर उडवले

अमेरिकेने सलग सहाव्या रात्री इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले...