PMRDA च्या पथकाने१०० हून अधिक नागरिकांची सुरक्षित सुटका!

Date:

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या अग्निशमन विभाग आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाने (PDRF) गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वीपणे सामना केला आहे. लोणावळा, मावळ, खेड आणि लोहगाव परिसरातील पूरस्थिती व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे १०० हून अधिक नागरिकांचे तसेच एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

प्रमुख रेस्क्यू ऑपरेशन्स

  • वाकसई, लोणावळा (एकांत नगर): येथील वालोसिटी व्हिला, मँगो व्हिला आणि ओरिकल व्हिला या तीन निवासी घरांच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. घरात अडकलेल्या ३४ नागरिकांना पथकाने लाईफ रिंग, लाईफ जॅकेट आणि रोप (दोरी) यांच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले.
  • मळवली (ता. मावळ): सूर्या व्हिला परिसरातील घराभोवती पाणी साचल्याने अडकलेल्या २० नागरिकांना आणि एका कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
    ○ मळवली-बोरज रोडवरील अंकित ग्रुप सोसायटी-२ (विंटर हार्वेस्ट-४२) येथून १५ नागरिकांचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
  • कार्ले-लोणावळा परिसर: माऊंट वेस्ट क्रिस्टा सोसायटीमध्ये पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या २१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
    ○ इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ३ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
  • लोहगाव (आदर्श नगर): रस्त्यावर साचलेल्या पाण्यात एक बस पूर्णपणे अडकली होती. पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बसमधील १० ते १२ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
  • ग्रीन लँड व्हिला, लोणावळा: पाण्यात अडकलेल्या २ वृद्ध व्यक्तींना आपत्ती प्रतिसाद पथकाने वेळेत सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

शोधमोहीम आणि इतर दुर्घटना

  • भूस्खलन (दरड कोसळणे) – नॉर्थ पॉइंट व श्री सिक्स्टी रिसॉर्ट परिसर: या परिसरात भूस्खलन झाले असून काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एसटीओ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
  • बुडालेल्या व्यक्तींचा शोध (ता. खेड):
    ○ मौजे शेलू: पाण्यात बुडालेल्या १ व्यक्तीला शोधून बाहेर काढण्यात आले आहे.
    ○ मौजे रेटवडी: पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधकार्यासाठी PDRF चे पथक रवाना झाले असून शोधमोहीम सुरू आहे.

पॉलिहाऊस नर्सरीला लागलेली आग आटोक्यात

  • लोणी काळभोर (थेऊर): ६ जुलै २०२६ रोजी रात्री २३.१६ वाजता पोर्ली फार्म (गट क्रमांक ३३५/३३६) येथील एका मोठ्या पॉलिहाऊस नर्सरीला आग लागली होती. आंधळे पोलीस स्टेशनकडून वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. होज रील तसेच दोन होज लाईन्सच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवण्यात आली.

🙏 नागरिकांना आवाहन

मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थिती लक्षात घेता विनाकारण घराबाहेर पडू नका. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रशासनाशी संपर्क साधा.

📞 महत्त्वाचे संपर्क क्रमांक

  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष: ९५४५२८२९३०
  • नांदेड सिटी केंद्र: ०२०-६७५२०००१
  • मारुंजी केंद्र: ०२०-६७९९२१००
  • वाघोली केंद्र: ०२०-२९५१८१०१
PMRDA #PDRF #DisasterResponse #MonsoonPreparedness #EmergencyResponse #Pune #Lonavala #Maval #Chakan #Hinjawadi #diopune
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासला ८१% भरले!नदीतून नाही… कालव्यातून ५०० क्युसेक्स पाणी सोडले

पाणीपुरवठ्यासाठी नियंत्रित विसर्ग सुरू" पुणे, ७ जुलै २०२६पुण्याला पाणीपुरवठा करणारे...

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच कोसळली; मलबा हटवून दोन मार्गिकांवर वाहतूक सुरू

उर्वरित दोन मार्गिकांवर पाणी; वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे ‘एमएसआरडीसी’चे आवाहन पुणे...