पुणे: शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत गब्बर होण्याचे आमिष पुण्यातील आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला नडले आहे. कोथरूड परिसरातील एका ७० वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सायबर चोरट्यांनी ऑनलाईन जाळ्यात ओढून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित वृद्धाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी या ज्येष्ठ नागरिकाशी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला होता. नामांकित कंपन्यांचे शेअर्स आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा मोठा नफा मिळेल, अशी बतावणी त्यांनी केली. विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्यांनी एका बनावट अॅपवर वृद्धाला आभासी (Virtual) नफा दाखवला, ज्यामुळे आपल्या खात्यात पैसे जमा होत असल्याचा त्यांचा भ्रम झाला. या मोहात पडून वृद्धाने आपल्या बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १ कोटी १० लाख रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर वळवले. मात्र, जेव्हा त्यांनी मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी संपर्क तोडला आणि मोबाईल बंद केला.
एका कॉलवर कोथरूडमधील पेन्शनराची आयुष्यभराची पुंजी लुटली; १.१० कोटींची फसवणूक
Date:

