दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे माईर्स एमआयटीचे डॉ.विश्‍वनाथ कराड समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Date:

पुणे : शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांना मुंबई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ स्मृति प्रतिष्ठानतर्फे समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान ह्रदयेश आर्टस आयोजित दीनानाथ मंगेशकर यांच्या ७५व्या स्मृतिदिन सोहळ्या निमित्त   हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिह्न व एक लाख एक हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर, पं. ह्रद्यनाथ मंगेशकर, श्रीमती उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई येथे श्रीषण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात समर्पित जीवन गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले की, विज्ञान आणि अध्यात्माचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करावयाचा प्रयत्न केला. आज मिळालेल्या पुरस्काराने मला आंतरिक समाधान लाभले. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि ते साकार होतांना दिसत आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे मंगेशकर कुटुंबीय आहेत.

आपल्य अध्यक्षीय भाषणात सरसंघचालक मा. मोहन भागवत म्हणाले की, डॉ.विश्‍वनाथ कराड यांनी उच्चारलेल्या ङ्गविश्‍वशांतीङ्घ संकल्पनेला पर्याय  नाही. भारतीय संस्कृती ही विश्‍वकल्याणकारी संस्कृती आहे. संत ज्ञानेश्‍वरांनीसुद्धा विश्‍वकल्याणाचा उल्लेख केला आहे. जगात परिवर्तन होतांना नकारात्मक भावनेला मागे सारून देश तेजस्वीपणे वाटचाल करीत आहे. भारताने सदैव विश्‍वकल्याणाचाच विचार संपूर्ण मानवजातीला दिला आहे. या स्वरूपाचे वैचारिक अधिष्ठान मिळाल्याशिवाय समाज खर्‍या अर्थाने प्रगती करु शकणार नाही.

अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहिल्यास त्यामधून संस्कार व प्रेरणा मिळते, जी सर्वांना आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरते, असे ते म्हणाले. म्हणूनच यानंतर होणार्‍या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित  रहावे, असा  बहुमूल्य सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

कोणीही पुरस्कारासाठी कार्य करीत नाही तर कलासाधना करून भगवंताची पूजा करतो. तेच कार्य मंगेशकर घराण्याने संगीत क्षेत्रात केले आहे. प्रतिभेचा दिवा लावल्यावर आपोआपच अंधार नाहीसा होईल असेही ते म्हणाले.

यावेळेस प्रसिद्ध गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव, अभिनेता आमीर खान, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री आशालता वाबगांवकर, गायिका कौशिकी चक्रवर्ती, लेखिका विजया राजाध्यक्ष, समाजसेवक किशोर देशपांडे आणि डॉ. उदय निरगुडकर यांनाही सन्मानित करण्यात आले.

पं. ह्रद्यनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे यांनी केले. आदिनाथ मंगेशकर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....