पिंपरी- मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शहर कमिटीच्या वतीने सुट्टीचा एक दिवस अनाथ मुलांबरोबर घालविण्याचे ठरवून नवी सांगवी येथील समता नगर ,गणेशनगर येमथे त्यांना मदतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली.संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांचा वाढदिवस आनाथ मुलांबरोबर साजरा करण्याचे कार्यकत्यांनी ठरविले व या मुलांना मदत व्हावी या हेतून प्रभात फेरी काडून अनाथ लेकराला
प्रेम का करेल कोणी…
नाहीत त्याला आई-बाबा
जवळ न नातलग कोणी…
आहे काय गुन्हा त्याचा
नाही त्याचे भाऊ-बंधू कोणी…
तो आहे एकटा, खुप वेगळा
आई-बाबा गेले, नाही त्याचे कोणी…
शिक्षण कुणी देईल का त्याला
नाहीत हो त्याचे नाथ कोणी…
द्याल का तुम्ही शिक्षण याला
अनाथाचे नाथ होईल का कोणी…
नका देऊ पैसा त्याला पैशाची त्याला भुक नाही
प्रेमाचा वर्षाव त्याच्यावरी करेल का कोणी……
माहीत न त्याला कोण आई-बाबा
आई-बाबाचे प्रेम द्याल का कोणी…
मिळत नाही खरे प्रेम त्याला
नाहीत आई-बाबा, नातलग कोणी…
अनाथ मुलावर प्रेम करा
प्रेमासाठी अनाथ नाही कोणी-
कोणी…अशी साद संस्थेच्या वतीने नवी सांगवी येथील नागरीकांना घातली. नागरीकांनी ही मोठ्या प्रमानात मदत केली त्यात पाच पोते गहू, तीन पोते ज्वारी, एक पोते तांदूळ तसेच 200 नग साबण व एक टेंपो कपडे आणि इतर जीवनाश्यक वस्तू व शालेय उपयोगी वस्तू गोळा करून वढू ब्रुदुक येथील माहेर या अनाथ आश्रमास भेट देण्यात आली. या अनाथ आश्रमात एकूण 850 मुले, मुली व 300 निराधार महिला आहेत. त्या मुलांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च ही माहेर संस्था करते.या सामाजिक संस्थेला मदत व्हावी व येथिल मुलांचा एक दिवस सुट्टीचा आनंदात जावा या हेतुन सदर उपक्रम करण्यात आला.यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, नगरसेविका माधवी राजापुरे, वढु. ब्रु.चे सरपंच प्रफुल्ल शिवले, वढु ब्रु. सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय शिवले, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, प्रदीप गायकवाड सा.का. सौरभ शिंदे, सा.का.संदिप दरेकर,शुभाष चच्हाण, अंबादास शाहाणे , गोरख वाघमारे , महेश वैद्य , पी.पी.पिल्ले, विनायक विसपुते, आदी उपस्थित होते. वसंत चकटे, दिपक शहाणे, सूर्यकांत बरसावडे, काशीनाथ पवार, सुधाकर जगताप, निलेश हणचाटे, शिवानंद तालीकोटी आदींनी संयोजन केले.