पुणे :- संपूर्ण राज्यात रियल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट(रेरा) १ मे पासून लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रेडाई महाराष्ट्रतर्फे त्यांच्या ४१ शहरातील विकासकांसाठी २७ एप्रिलला हॉटेल वेस्टीन येथे होणार आहे. प्रथमच राज्यपातळीवरील एका संघटनेने ‘रेरा’ सारख्या महत्वाच्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे प्रमुख गौतम चटर्जी हे या कार्यशाळेमध्ये ‘रेरा’ कायदा त्यावरील मार्गदर्शन,विकासकांच्या प्रश्नांचे-शंकांचे निरसन करणार आहेत. यात ४१ शहरातून क्रेडाईचे ९०० सदस्य उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली याशिवाय ‘रेरा’या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी गौतम चटर्जी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,असे रेरा कमिटीचे समन्वयक अखिल अग्रवाल, आय. पी. इनामदार आणि माजीद काची यांनी सांगितले