Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘कॅशलेस मेडिक्लेम ’ प्रकरणात पुण्यात डॉक्टरांची दादागिरी ; रुग्णांना वाली कोणी उरला नाही ..लोकप्रतिनिधी करतात काय ?

Date:

पुणे- गर्भश्रीमंत असूनही सामुहिक एकीची राक्षसी ताकद  वारंवार दाखवून रुग्णांना आणि प्रसंगी सरकारलाही वेठीस धरणाऱ्या डॉक्टरांसाठी… त्यांच्यावर संतापलेल्या कोणी हल्ला करू नये,रुग्णालयांची मोडतोड कोणी करू नये.. या उद्देशाने विशेष कायद्याची तरतूद तर सरकारने यापूर्वीच केली .रुग्णांच्या हक्कासाठी मात्र आता पुढे येताना कोणी दिसत नाही असे असतानाही  डॉक्टरांच्या मनमानीत मात्र कमतरता येताना कुठे दिसत नसल्याचे चित्र आहे. ‘कॅशलेस मेडिक्लेम ’प्रकरणात आता पुन्हा एकदा डॉक्टरांच्या समुहाने रुग्णांना वेठीस धरून विमा कंपन्यांना जेरीस आणण्याचा प्रकार सुरु केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे .

शहरातील ६८ रुग्णालयांनी २१ एप्रिलपासून ‘कॅशलेस’ (विनारक्कम) वैद्यकीय विम्याची सुविधा पुरवणे बंद केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील चार विमा कंपन्यांनी स्थापन केलेल्या ‘जिप्सा’ कंपनीने रुग्णालयांबरोबर कराराचे नूतनीकरण केले नाही, तसेच मोठय़ा रुग्णालयांनी मागितल्याप्रमाणे ६४ प्रकारच्या उपचारांमध्ये दरवाढ दिली नाही, म्हणून या रुग्णालयांनी ‘कॅशलेस’ सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला.

आधी पैसेच भरायची ताकदच असेल तर ‘कॅशलेस मेडिक्लेम ’ घेवू कशाला ? असे रुग्णांचे म्हणणे समजून न घेता पहा नेमके काय होते आहे …

‘जिप्सा’ कंपन्यांच्या एकेकटय़ा (इंडिव्हिज्युअल) तसेच ‘कॉर्पोरेट’ अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना ‘कॅशलेस’ वैद्यकीय सेवा मिळणार नसल्यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. रुग्णालयात आधी पैसे भरून उपचार घेणे आणि नंतर विम्याचा परतावा मिळवणे हाच पर्याय त्यांच्यासमोर उरणार आहे. मोठय़ा रुग्णालयांच्या संघटनेचे अध्यक्ष बोमी भोट म्हणाले, ‘‘‘जिप्सा’ कंपन्यांबरोबरचा आमचा करार ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. तत्पूर्वी जानेवारीमध्ये कंपनीस कराराच्या नूतनीकरणाविषयी पत्र पाठवले होते. करार संपल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत आम्ही थांबलो, परंतु नूतनीकरण झाले नाही. त्यानंतर ‘कॅशलेस’ विम्यास संमती मिळणे बंद झाल्यामुळे आम्ही ही सुविधा बंद केली आहे. संघटनेतर्फे ६४ प्रकारच्या उपचारांसाठी दरवाढीची मागणी करण्यात आली होती, ती देखील मान्य झाली नाही.’’

तुम्ही सामान्य असला तरी ,आम्हाला अगोदर पैसे द्या …

‘न्यू इंडिया अश्युरन्स’, ‘युनायटेड इंडिया इन्श्युरन्स’, ‘ओरिएंटल इन्श्युरन्स’ आणि ‘नॅशनल इन्श्युरन्स’ या चार विमा कंपन्यांचा ‘जिप्सा’मध्ये समावेश आहे.‘जिप्सा’ कंपनीने देऊ केलेले उपचारांचे दर मान्य नसल्यामुळे पुण्यातील लहान रुग्णालयांनी ‘कॅशलेस’ वैद्यकीय विमा सुविधा १ डिसेंबर २०१४ पासूनच बंद केली आहे. सध्या ही रुग्णालये केवळ ‘कॉर्पोरेट’ ग्राहकांना ही सेवा देतात. सामान्यांनी ‘कॅशलेस’च्या भानगडीत न पडता आधी खर्च करून परतावा घेण्याचा मार्ग स्वीकारावा, असे मत लहान रुग्णालयांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन भगली यांनी व्यक्त केले. ‘‘कॅशलेस’साठी अधिक ‘प्रीमियम’ भरूनही रुग्णांना घराजवळचे रुग्णालय निवडण्याचा पर्याय मिळत नव्हता. केवळ मोठय़ा रुग्णालयांमध्येच त्यांना जावे लागत होते,’ असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:साळुंखे विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यास...

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही नांदेड दि.११ :- देगलूर तालुक्यातील तमलूर...

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक...

मिथक कथेतून वास्तवाचा बोध घ्या :प्रा.अशोक राणा

पुणे :, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या...