Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘गोल्डमॅन’ ऋषिकेश जोशी

Date:

हरहुन्नरी ऋषिकेश जोशी, आपल्या  वैविध्यपूर्ण अभिनयाने कमालीचे लोकप्रिय आहेत. सोबत  त्यांनी लेखक आणि  दिगदर्शक  म्हणूनही  मनोरंजनसृष्टीवर  स्वतंत्र  ठसा  उमटवला आहे.  सध्या  मात्र एका  वेगळ्याच  कारणाने  ते  प्रसिद्धीच्या  झोतात आलेले आहेत.  गोल्डमॅन  म्हणून सध्या ते  सगळीकडे वावरतायेत.  त्यांच्या अंगावरील दागिन्यांमुळे  त्यांना ही आवड कधी निर्माण  झाली ? हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. आगामी ‘पाणीपुरी’  या चित्रपटातील ‘बबन’  ही  व्यक्तिरेखा ऋषिकेश जोशी  साकारत असून या  बबनला अंगावर दागिने घालून  मिरवण्याची हौस आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.   

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना ऋषिकेश जोशी सांगतात, अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारा ‘बबन’  हे एक  मजेशीर  पात्र आहे.  बबनच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि  घड्याळ  असते. मला स्वतःला ही भूमिका  करताना मजा आली. त्यामुळे प्रेक्षकही ही  भूमिका  एन्जॉय करतील असा विश्वास  ते व्यक्त  करतात.  या चित्रपटात  ऋषिकेश जोशी, यांच्यासोबत विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे,प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर,अभय गिते आदि कलाकार आहेत.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी  लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या  गीतांना  गायक मंदार आपटे, अजित परब  यांचे  स्वर लाभले आहेत.

मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...