मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे माहीममधून लढणार आहेत.राज ठाकरेंच्या मुलास पाठिंबा देण्यावरून शिंदेसेना भाजपमध्येही वाद उफाळला आहे.महायुती व महाविकास आघाडीच्या ७५% उमेदवारांची नावे जाहीर झाली तरी अजून जागावाटप ठरलेले नाही. दुसरीकडे जाहीर झालेल्या जागांवरून दोन्ही गटांत वादांची मालिका सुरूच आहे.
माहीम मधून शिंदे सेनेने आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे, तर भाजपने मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित यांना युतीने पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव ठेवला. मनसेने लोकसभेत पाठिंबा दिला होता, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पाठिंब्यास अनुकूल आहेत, मात्र शिंदसेनेने हा मतदारसंघ न सोडण्याची भूमिका घेतली आहे. आमदार सदा सरवणकर म्हणाले, ‘राज ठाकरे आणि शेलार मित्र आहेत. त्यामुळे ते बोलले असतील, पण माझ्यावर दबाव नाही. मुख्यमंत्र्यांनी मला एबी फॉर्म दिला आहे. मी अर्ज भरनारच, मला मागच्या दाराने जाणे पसंत नाही.’ दरम्यान, सरवणकरांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या शेकडो समर्थकांनी प्रभादेवीत शक्ती प्रदर्शन केले.