मुंबई- वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिवाळीच्या सुट्टीमुळे गाड्यांना मोठी गर्दी आहे. गोरखपूर एक्सप्रेसमधून जाण्यासाठी बांद्रा स्टेशनवर जमलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि यानंतर चेंगराचेंगरी झाली.शब्बीर अब्दुल रहमान (40), परमेश्वर सुखदार गुप्ता (28), रवींद्र हरिहर चुमा (30), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कांगे (27) अशी जखमींची नावे आहेत. दिव्यांशु योगेंद्र (18), मोहम्मद शरीफ शेख (25), इंद्रजीत साहनी (19) आणि नूर मोहम्मद शेख (18),अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.