पुणे-धनकवडी तील पंचवटी सोसायटी ते काळूबाई मंदिर दरम्यान १ सप्टेंबर रोजी झालेल्या खुनी हल्ल्यातील ७ आरोपींना पुणे पोलिसांनी १२ तासाच्या आत गजाआड करण्याची कामगिरी केली आहे. १) मल्लेश पांडुरंग कांबळे, वय ३८ वर्षे, रा. समाज मंदिरा समोर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी, पुणे. २) रवी आनंद चव्हाण, वय २० वर्षे, रा. गल्ली नं. बी/५४, दुर्गामाता मंदिरजवळ, दुर्गामाता गार्डन, सुप्पर, बिबवेवाडी, पुणे. ३) दत्ता रामचंद्र जाधव, वय २२ वर्षे, रा. गणपतनगर, पापळ वस्ती, विहरीजवळ, विववेवाडी, पुणे ४) सार्थक बाळासाहेब कुडले, वय २० वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ, दुर्गामाता गार्डन जवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे. ५) अक्षय अप्पा मोहिते, वय २४ वर्षे, रा. सरगम चाळ नं.१, खोली नं.४८ जय तुळजाभवानी नगर, गंगाधाम रोड, आप्पर विववेवाडी पुणे. ६) स्वप्नील गणेश जाधव, वय १९ वर्षे, रा. पद्मावती मंदिर जवळ, व्हिआयटी कॉलेज समोर, सुपर बिबवेवाडी, पुणे ७) निरंजन उत्तम देवकर वय १९ वर्षे रा. गल्ली नं.०४, आंबामाता मंदिराजवळ सुखसागर नगर कोंढवा पुणे अशी या आरोपींची नावे आहेत अन्य दोन आरोपी अल्पवयीन आहेत .
पोलिसांनी सांगितले कि ,’ दि.०१/०९/२०२४ रोजी पंचवटी सोसायटी, धनकवडी, पुणे येथील गेटजवळील स्पिडब्रेकर जवळ व काळूबाई मंदिराजवळील चायनिज सेंटर, धनकवडी, पुणे जवळ फिर्यादी यांना व त्यांचे मित्र यांना जुन्या भांडणाच्या कारणा वरुन मल्लेश कांबळे, रवि चव्हाण, यश चव्हाण, अक्षय मोहिते, दत्ता जाधव, सार्थक कुडले व इतर दोन साथीदार या सर्वांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन “आज यास जिवंत सोडायचे नाही” असे म्हणुन संगनमत करुन जिवे मारण्याच्या हेतुन धारदार हत्याराने वार केले व व त्यानंतर ते सर्वजण गाडीवर बसून तेथून निघून गेले. त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं २८१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १८९ (२),१९१(२), १९१(३),१९० आर्म अॅक्ट ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील आरोपींचा गुन्हा घडले नंतर सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा करून आरोपी हे तिन हत्ती चौक धनकवडी पुणे येथुन दुचाकीवरुन पळुन चालले आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनिरी. सागर पाटील व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंगलदार यांनी आरोपीचा तिन हत्ती चौका पासुन दुचाकीवरून पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले.आणि अटक करण्यात आली असुन दोन विधीसंर्धीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद आरोपी याच्याकडे सहकारनगर पोलीस स्टेशन वरील दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणा वरुन धारदार हत्याराने व हाताने मारहाण केल्याचे कबुल केले.