Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आंदेकर खून प्रकरण ; ताम्हिणी घाटात १३ मारेकरी पकडले

Date:

पुणे : पुण्यात रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत बेसावध पणे गप्पा मारत थांबले असताना सहा दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकरला घेरलं.आणि त्यांच्यावर हल्ला करून खून केला. हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्या १३ आरोपीना पोलिसांनी पाठलाग करत ताम्हिणी घाटात पकडले आहे. पोलिसांनी काल या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती.

वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून खून झाल्याची शक्यता दिसत आहे. मात्र, यामागे टोळी वर्चस्वही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी आहे. त्याची स्वत:ची टोळी असून, तो मोक्कातून जामिनावर बाहेर पडला आहे. स्वतः सोमनाथ आणि टोळीतील काही सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. नाना पेठेसारखा गजबजलेला भागात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एरवी मित्रांच्या गराड्यात असणारा वनराज रविवारी मात्र चुलत भावासोबत थांबला होता. जवळच त्याचं घर होतं. आणि घरापासून चालत चालत तो मुख्य रस्त्या लागत असणाऱ्या चौकात आला होता. हल्लेखोर त्याची वाट पाहत दबा धरूनच बसले होते. मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच ६ दुचाकी त्याच्या दिशेने धावल्या. सुरुवातीला एकाने आंदेकरवर गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या त्याच्यावर झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडला. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्यानेही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले पाहून नंतर मारेकर्‍यांनी पळ काढला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तब्बल 13 जण या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. कौटुंबिक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आता १३ जणांना ताब्यात घेतल्यावर पुणे पोलीस लवकरच घटनेचा तपास पूर्ण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...

त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिली….

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य...