पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्षपदी पुनम विशाल विधाते यांची निवड करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूनम विधाते यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
पूनम विधाते ह्या गेली अनेक वर्ष राजकारणासह सामाजिक कार्यात सक्रिय कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीनंतर पुनम विधाते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, महिला शहराध्यक्ष प्रिया गदादे यांचे आभार मानले.
नवी जबाबदारी मिळाल्यानंतर पूनम विधाते म्हणाल्या की, नव्या जबाबदारीसह नवीनं आव्हान स्वीकारताना जास्तीत जास्त महिलांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.