संभाजीनगर, दिनांक २ सप्टेंबर २०२४-
पुण्याच्या ओंकार जोग, सुनील बाब्रस, सारिका वर्दे, वीणा जोशी व मनीषा बोडस यांची विजेतेपदावर मोहोर उमटविली आणि प्रौढांच्या तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.
सरस्वती भुवन बॅडमिंटन हॉल मध्ये संभाजीनगर प्रौढ टेबल टेनिस अकादमीने महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेतील ३९ वर्षावरील गटात ओंकार जोक यांनी अंतिम फेरीत आपले सहकारी अमित ढेकणे यांचा ११-८,११-७,११-९ असा पराभव करीत आपले अग्रमानांकन सार्थ ठरविले. उपांत्य फेरीत त्यांनी मनीष बात्रा यांना १३-११,११-५,११-९ असे पराभूत केले होते तर ढेकणे यांनी पुण्याच्याच आदित्य गर्दे यांचे आव्हान ११-७,११-९,६-११,११-५ असे संपुष्टात आणले होते. ५९ वर्षावरील गटात बाब्रस यांनी अंतिम फेरीत नागपूरच्या अशोक कळंबे यांचे आव्हान ११-८,११-७,११-७ असे सहज परतविले. उपांत्य फेरीत त्यांनी मुंबई उपनगरच्या पुरुषोत्तम मरकड यांचा ११-९,११-८,११-७ असा पराभव केला होता तर कळंबे यांनी मुंबई जिल्हा महानगर संघाच्या प्रशांत माचवे यांचा ११-७,११-९,११-९ असा पराभव केला.
महिलांच्या ३९ वर्षावरील गटात सारिका वर्दे यांनी अंतिम सामन्यात ठाण्याच्या श्रुती कानडे-जोशी यांचा ११-८,११-०,११-० असा दणदणीत पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांनी यवतमाळच्या स्नेहल भोळे यांना ११-४,१०-१२,१२-१०,११-६ असे हरविले होते तर जोशी यांनी पुण्याच्या विनी करोळे यांच्यावर ११-७,११-४, १०-१२, ११-७ अशी मात केली.
स्पर्धेतील ६९ वर्षावरील गटात पुण्याच्या वीणा जोशी यांनी नाशिकच्या अंजली कानेटकर यांच्यावर ११-६,११-८,११-६. असा सहज विजय नोंदविला आणि अजिंक्यपद पटकाविले. ७४ वर्षांवरील गटात मनीषा बोडस या विजेत्या ठरल्या. पुण्याच्या या खेळाडूंनी आपल्या सहकारी ज्योत्स्ना पटवर्धन यांना ११-८,११-७,११-६ असे पराभूत केले.
या स्पर्धेतील अन्य निकाल पुढीलप्रमाणे
महिला- ४९ वर्षावरील अंतिम सामना शिल्पा जोशी टाकळकर (ठाणे) विजयी विरुद्ध शिवप्रिया नाईक (ठाणे) ९-११, ११-३,११-७,११-७. उपांत्य फेरी- टाकळकर विजयी विरुद्ध तृप्ती माचवे ११-२,११-८,११-६ नाईक विजयी विरुद्ध वैशाली माळवणकर ११-६,११-३,११-५.
५९ वर्षावरील अंतिम सामना- नीता कुलकर्णी (मुंबई महानगर जिल्हा) विजयी विरुद्ध मनीषा प्रधान (टी एस टी टी ए) ११-६,११-६,११-६ उपांत्य फेरी- कुलकर्णी विजयी विरुद्ध रोहिणी ऐलावार ८-११,३-११,११-९,११-८,११-६ प्रधान विजयी विरुद्ध नूतन दिखिले ११-३,११-५, १२-१०.
६४ वर्षावरील अंतिम सामना- राजेश्वरी म्हेत्रे टी एस टी टी विजयी विरुद्ध मैथिली सोधी १६-१४,११-४,११-५. उपांत्य फेरी म्हेत्रे विजयी विरुद्ध प्रतिभा सावंत ११-८,१०-१२,१४-१२,११-८ सोधी विजयी विरुद्ध उज्ज्वला सुतार ११-३,११-६,११-३
पुरुष ४९ वर्षावरील अंतिम सामना मनीष रावत (सोलापूर ( विजयी विरुद्ध बसाब चौधरी (नागपूर) ११-९,८-११,११-४, १२-१० उपांत्य फेरी- रावत विजयी विरुद्ध प्रसाद नाईक ११-७,११-४,११-५.चौधरी विजयी विरुद्ध रवींद्र जोशी ११-७,७-११, ११-५,११-५.
६४ वर्षावरील अंतिम सामना जयंत कुलकर्णी (मुंबई जिल्हा महानगर) विजयी विरुद्ध उमेश कुंभोजकर (नाशिक) ११-६,७-११,११-६,११-४ उपांत्य फेरी- कुलकर्णी विजयी विरुद्ध लोकबहादुर सिंग (नागपूर) ११-२,९-११,११-७,८-११, ११-४. कुंभोजकर विजयी विरुद्ध अविनाश जोशी ११-५,११-१३,१३-११,९-११,११-५.