पुणे- आज १ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार यांनी पत्रकारांना सांगितले कि काही संशयीतांची चौकशी सुरु आहे . ५ गोळ्या झाडल्याचे प्राथमिक दृष्ट्या समजले आहे या शिवाय त्यांच्यावर धारदार हत्याराने वारही झालेले आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर आणि चौकशी झाल्यावर हत्येची कारणे, संशयितांची नावे आणि अधिक संबधित प्रकरणी सविस्तर माहिती देऊ असे ते म्हणालेत.