मुंबई-छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नियमबाह्य कामांची माहिती उघड झाली आहे,6 फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती; मग उंची वाढली कशी?पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर कोणाच्या परवानगीने केला ?पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी कोणत्या वास्तू विशारदाची परवानगी घेतली ? हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता.या प्रकरणी आता राज्याच्या कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ 6 फुटांचा पुतळा बसवण्याची परवानगी दिल्याचा दावा केला आहे. याशिवाय अनेक नियमात न बसणाऱ्या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
राजीव मिश्रा यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, राज्यात कुठेही महापुरुषांचा पुतळा उभा करायाचा असेल तर कला संचालनालयाची परवानगी घेणे बंधनकारक असते. अन्यथा कुणालाही पुतळा उभारता येत नाही. आमच्याकडे एखादी एजन्सी पुतळा उभारण्याची परवानगी मागते, तेव्हा त्यांना संबंधित पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. प्रस्तुत प्रकरणात शिल्पकाराने 6 फुटांचे क्ले मॉडेल सादर केले होते. त्यानंतर कला संचालनालयाची तज्ज्ञ, कला इतिहासकार व कलाकार यांचा समावेश असणआरी समिती क्ले मॉडेलची तपासणी करून परवानगी देत असते.
या तपासणीत ज्या महापुरुषाचा पुतळा आहे, त्याचे पुतळ्यातील हावभाव, त्यांची शारीरिक रचना यावर बारकाईने कटाक्ष टाकलो जातो. यानंतर क्ले मॉडेलला परवानगी दिली जाते. त्यानंतर संबंधित शिल्पकार त्याला पुढे कशाप्रकारे नेतो ही त्याची जबाबदारी असते.
राजीव मिश्रा पुढे बोलताना म्हणाले की, मालवणच्या घटनेत आम्ही केवळ 6 फुटांच्या क्ले मॉडेलला मंजुरी दिल्याची बाब नौदलाला कळवण्यात आले होते. पण त्यानंतर या पुतळ्याची उंची वाढवली गेल्याची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही. तसेच पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर होणार असल्याची कल्पनाही आम्हाला देण्यात आली नव्हती. पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाची परवानगी घ्यावी लागले. दोन्ही मंजुऱ्या मिळाल्यानंतर शिल्पकाराला तसे पत्र दिले जाते. त्यानंतर शिल्पकाराची जबाबदारी असते.
राजीव मिश्रा यांच्या या स्पष्टोक्तीमुळे कला संचालनालयाने राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची उंची केवळ 6 फूट निश्चित केली होती, तर मग या पुतळ्याची उंची कशी वाढली? त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी मिश्रा यांना छेडले असता ते म्हणाले, ज्या एजन्सीकडून पुतळा उभारण्यात आला असेल त्यांनी शिल्पकाराला उंची वाढवण्याची सूचना केली असेल तर शिल्पकाराने त्यासंबंधीचा अभ्यास करण्याची गरज होती. कारण, एवढ्या मोठ्या उंचीचा पुतळा उभारण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घ्यावी लागते. तसेच त्या परिसरात पुतळा उभारताना कोणती तांत्रिक काळजी घेण्याची घ्यावी लागेल हे ही पहावे लागते. कदाचित हा अभ्यास न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असेल, असे मिश्रा मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण 43 फूट उंच होता. त्यात जमिनीपासून बांधकाम 15 फूट चबुतरा, तर त्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. हा भव्य पुतळा 26 ऑगस्ट रोजी दुपारी अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.