गुरुवारी शिवसेनेचा पुणे महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा शिक्षण मंडळासमोर ठिय्या आंदोलन– प्रमोद नाना भानगिरे

Date:

पुणे, दि. २८ जुलै : पुणे महानगरपालिकेचा ढासळलेला प्रशासकीय कारभार, निकृष्ट दर्जाची विकासकामे, घनकचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी, निविदा प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न, शिक्षण मंडळातील महत्त्वाची फाईल गायब होण्याची घटना, महापालिकेच्या मालकीचे एलईडी प्रकाशदिवे चोरीस जाण्याचा प्रकार, दूषित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पावसाळ्यात जलमय होणारे रस्ते, पीएमपीएमएलमधील पदोन्नती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेले गंभीर प्रश्न तसेच घनकचरा विभागातील आठ ते दहा वर्षे सेवा बजावलेल्या सुमारे १५० कंत्राटी कामगारांना अचानक सेवेतून कमी करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या वतीने गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पुणे महानगरपालिका आवारातील शिक्षण मंडळ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, शिक्षण मंडळातील महत्त्वाची फाईल गायब होण्याच्या घटनेबाबत संबंधित प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्तांना विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करून तातडीने ठोस भूमिका घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “पुणेकरांकडून कराच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा महसूल जमा होत असताना नागरिकांना निकृष्ट दर्जाची विकासकामे, दूषित पिण्याचे पाणी, अस्वच्छता, खचणारे रस्ते, निष्क्रिय प्रशासन आणि उत्तरदायित्वाचा अभाव याशिवाय काहीच मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. घनकचरा व्यवस्थापनातील प्रश्न, निविदा प्रक्रियेबाबत निर्माण झालेला संशय, शिक्षण मंडळातील फाईल गायब होणे, एलईडी प्रकाशदिव्यांची चोरी, पीएमपीएमएलमधील पदोन्नती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि अनेक वर्षे सेवा बजावलेल्या कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी करणे या घटना स्वतंत्र नसून प्रशासनातील गंभीर त्रुटी अधोरेखित करणाऱ्या आहेत. या सर्व प्रश्नांवर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घेऊन पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना पुणेकरांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारेल.” या जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान भारत कार्ड मोहिमस्तरावर उपलब्ध करुन द्यावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा पुणे, दि. 28:...

 उंच इमारती व फ्लॅटस योजनांनी निकष पाळलेत काय हे तपासा तोवर फ्लॅटसची नोंदणी स्थगित – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महानगराच्या विकासकामांचा आढावा नागपूर,  : वाढत्या महानगराच्या...

मुळशीतील रिंगरोडजवळच्या जमिनी कोणी लाटल्या?’; प्रवीण तरडेंची पोस्ट चर्चेत

‘सगळ्यांचा हिशोब होणार, मूळ मालक शेतकरीच’; ‘मुळशी पॅटर्न २’ची...

पोलिस वाहनाचा पाठलाग करून कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड

पुणे-पुणे शहरातील कुख्यात गुंड कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांवर...