पुणे-संगीत नाटक अकादमी,सांस्कृतिक विभाग,भारत सरकार,नवी दिल्लीच्या सहकार्याने नंदकिशोर कल्चरल सोसायटी आणि *नृत्यांगन कथक नृत्य अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वंडरसीटी , कात्रज,पुणे येथे कथ्थक नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये एकूण १०० कलाकार विद्यार्थी सहभागी झाले होते.या मध्ये गुरु डॉ. पंडित नंदकिशोर कपोते सर, संगीत नाटक अकादमी अवॉर्डी यांनी स्वतः कथक नृत्य कार्यशाळेमध्ये प्रात्यक्षिक रूपाने विद्यार्थी वर्गाला नृत्य शिकवले व मार्गदर्शन केले. कथक नृत्या मधील पं.बिरजूमहाराज यांच्या गिनतीच्या तिहाई, तोडे, तुकडे, परण इत्यादी रचना शिकविल्या.कथक नृत्य शिकण्यासाठी दररोज रियाज *ततकार हा खूप गरजेचा आहे तो केलाच पाहिजे असे डाॅ.पं.नंदकिशोर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात समाजसेविका स्मिता कोंढरे, तबला वादक शंकर कुचेकर उपस्थित होते ह्या कार्यशाळेचे नियोजन नृत्यगुरू रेश्मा गोडांबे यांनी केले. कार्यशाळा सर्वांना मोफत होती.