पुणे-आर.एम.धारिवाल फाउंडेशन च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन व उपाध्यक्षा शोभा रसिकलालजी धारीवाल यांच्याद्वारे दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत आचार्य पद्मश्री चंदनाजी म . सा . आणि पू . श्री सुप्रियदर्शनजीं म . सा . आदीठाणा – ५ यांच्या उपस्थितीत ” उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक पठणाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक भवन यश लॉन्स , बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.कार्यक्रम वेळेवर ठीक ४ वाजता सुरु होईल. दिलेल्या नियोजित वेळेत लहान -थोर , जैन – अजैन या सर्वांनी सहपरिवार या महामंगलकारी स्तोत्रात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करत सहभागी होणाऱ्या पुरुषांनी शुभ्र तर महिलांनी केशरी वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे अशी माहिती फाऊंडेशनच्या शोभा रसिकलालजी धारिवाल यांनी दिली आहे.
जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री. उवसग्गहरं स्तोत्राच्या सामुहिक पठणाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजीत केले जाते. यावर्षी स्तोत्र पठणाचे आठवे वर्ष असून प्रथम कार्यक्रम २०१७ मध्ये दानशूर आदरणीय श्री. रसिकलालजी धारिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संत व साध्वी म . सा . यांच्या सानिध्यात संपन्न झाला होता .
. “श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह,रोगपिडा,शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे.