जिद्द, चिकाटी ही आव्हानांवर मात करण्याची गुरुकिल्ली – आनंदराव पाटील

Date:

पीसीयु मध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ सोहळा उत्साहात

पिंपरी, पुणे (दि. १७ ऑगस्ट २०२४) – शैक्षणिक प्रवासात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आयुष्याचा भक्कम पाया तयार करण्यासाठी शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे शिक्षण घेताना अनंत अडचणी आव्हाने आपल्यासमोर येतात या आव्हानांना जिद्द चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामोरे जा हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) उपलब्ध संसाधनांचा आणि संधींचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. पीसीयु येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘दीक्षारंभ – २०२४-२५’ या कार्यक्रमाव्दारे उत्साहात करण्यात आले. यावेळी ॲटलस कॉप्को‌ इंडियाचे मानव संसाधन विभाग प्रमुख कबीर गायकवाड, पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र कुलगुरू डॉ. सुदीप डी. थेपाडे, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. बिरादार, पीसीयु नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, श्री नरेंद्र लांडगे तसेच स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या वेगवान जगात अनुकूलता आणि सतत शिकण्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांना जिज्ञासू आणि मुक्त मनाने राहण्याचे आवाहन, कबीर गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांना मजबूत नेटवर्क तयार करण्यासाठी आणि त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक वृध्दी वाढवण्यासाठी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी चिकाटी, नाविन्य आणि शिक्षणात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. आपल्या देशाचे भविष्य घडवण्यात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पिंपरी चिंचवड विद्यापीठाबाबत व्हिजन सांगितले. सर्वांनी पीसीयु शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र बनवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन पाटील यांनी केले.
पीसीयु मध्ये असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जिथे विद्यार्थ्यांना दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी देऊन शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचबरोबर त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि नैतिक मूल्ये देखील जोपासली जातात असे डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
पीसीयु मधील विद्यार्थ्यांचा वेळ त्यांचे भविष्य घडवण्याची आणि समाजासाठी चिरस्थायी योगदान देण्याची अनोखी संधी आहे. पीसीयु मधील शैक्षणिक, क्रीडा विषयक वातावरण, अभ्यासक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विषयी डॉ. सुदीप थेपडे यांनी माहिती दिली.
दीक्षारंभ सोहळा हा केवळ स्वागतच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी आव्हाने आणि संधींचा उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने स्वीकार करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन आहे. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, नवनवीन शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करून समाजासाठी योगदान देण्यास तज्ज्ञांनी प्रोत्साहित केले. या नवीन अध्यायाला सुरुवात करताना, विद्यार्थ्यांनी पीसीयु मध्ये उभारलेला शैक्षणिक पाया केवळ त्यांच्या पुढील आयुष्याला आकार देणार नाही तर जगावर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्यासाठी सक्षम करेल, असे ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....