Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी, MPSC ने तारखा बदलाव्यात अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ: अतुल लोंढे

Date:

MPSC च्या आडमुठ्या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.

कर्नाटक सरकार जर तारखा बदलू शकते तर महाराष्ट्रात काय अडचण?

मुंबई, दि. १७ ऑगस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे. १८ व २५ ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एमपीएससीने परिक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन दोन तीन दिवसांनी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा हाय कार्टात दाद मागू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

टिळक भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्य आयोग परिक्षांच्या तारखा ठरवताना UPSC/IBPS/ Staff Selection commission च्या परिक्षांच्या तारख्यांचा अंदाज घेऊन ओव्हरलॅप होणार नाहीत अशा पद्धतीने तारखा ठरवण्याचा प्रघात चालत आला आहे. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतल्याचे यावेळी तरी दिसत नाही. एमपीएससी विद्यार्थ्यांवर सुड उगवण्याचे काम करत आहे. एकतर जागा निघत नाहीत आणि जागा निघल्या तर त्याचे नियोजन व्यवस्थित नसते. परीक्षा फक्त रविवारीच घ्यावी असा काही नियम नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून परिक्षांच्या तारखा ओव्हरलॅप होत असल्याचे दिसताच विद्यार्थ्यांचे हित पाहून आयोगाच्या परिक्षांची तारिख बदलण्याचे निर्देश दिले. जे कर्नाटक सरकार करू शकते ते महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही. सर्वसामान्यांचे सरकार आहे असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाकाखाली एमपीएससी मनमानी कारभार करते त्यात लक्ष लागण्याची गरज आहे.

ऍग्रिकल्चर संवर्गातील २०२ जागांवर विद्यार्थ्यांची निवड झाली असताना अद्याप त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, त्याच कृषी संवर्गातील २५८ जागांची मागणी सरकारने एमपीएससीकडे केलेली आहे पण एमपीएससीने त्या संवर्गाची लिंकच ओपन केलेली नाही, त्यामुळे २५ तारखेला जी परिक्षा होत आहे ती होऊ नये अशी आमची मागणी आहे. ती लिंक ओपन करण्यासंर्भात एमपीएससीकडून काहीही हालचाल होत नाही आणि मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस या प्रकरणी लक्ष घालण्यास तयार नाहीत असेही लोंढे म्हणाले.

एमपीएससीचे अधिकार अत्यंत मग्रूर आहेत, विद्यार्थ्यांच्या हिताशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. एमपीएसी परिक्षा उत्तिर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत, त्यांची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. एमपीएससी आडमुठी भूमिका घेऊन त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करण्याचे पाप करत आहे. आयोगाच्या या भोंगळ कारभाराला विद्यार्थी कंटाळले आहेत, त्यांना नैराश्य आले असून ते प्रचंड मानसिक ताणात आहेत. सरकारने लाडकी बहिण योजना काढली आहे तशीच लाडका भाचा स्पर्धा परिक्षा योजनाही काढावी, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...