Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारतीय वायुसेना आणि सैन्याने 15,000 फूट उंचीवर भीष्म क्रिटिकल ट्रॉमा केअर क्यूबचे केले पहिले अचूक पॅरा-ड्रॉप अवतरण

Date:

भारतीय वायुसेना (IAF) आणि भारतीय सैन्याने संयुक्तपणे 15,000 फूट  उंचीच्या परिसरात आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब या आरोग्य सेवा पुरवठा करणाऱ्या घनाकृती टपऱ्यांचे(ट्रॉमा केअर क्यूब्स), पॅराशुटच्या सहाय्याने (पॅरा-ड्रॉप) पहिले  अचूक अवतरण यशस्वी केले आहे. ट्रॉमा केअर क्यूब्स ही महत्त्वाची आरोग्यसेवा पुरवठा सेवा, BHISHM (भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अॅन्ड मैत्री अर्थात सहयोग, हितसंवर्धन आणि मैत्रीसाठी भारत आरोग्य उपक्रम) प्रकल्पा अंतर्गत भारतात विकसित केली आहे.  मानवतावादी मदत आणि आपत्तीग्रस्त भागांमध्ये सुटका आणि बचावकार्य (हुमॅनिटरियन एड अँड डिझास्टर रिलीफ-HADR) या अनुषंगाने  पुरवठा करण्याच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली.

आयएएफने हा क्यूब हवाईमार्गे अचूकपणे ईप्सित स्थळी  उतरवण्यासाठी आपल्या C-130J सुपर हर्क्युलस या आधुनिक योजनाबद्ध वाहतूक करणाऱ्या विमानाचा उपयोग केला. कुशल कार्यवाही आणि चपळाईसाठी परिचित असलेल्या भारतीय लष्कराच्या निमलष्करी दलाने, आपल्या आधुनिक अचूक अवतरण उपकरणांचा उपयोग करून, ट्रॉमा केअर क्यूब यशस्वीपणे उतरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ प्रदेशातही परिणामकारक HADR कार्यवाही करण्यात मोलाचा आणि प्रभावी हातभार लावण्याची विशेष लष्करी साहित्य सामुग्रीची क्षमता, या अशा प्रात्यक्षिकाने दाखवून दिली आहे.

BHISHM ट्रॉमा केअर क्यूबचे यशस्वी अवतरण आणि तैनात, सशस्त्र दलांच्या समन्वय आणि सहयोगाचे उदाहरण आहे आणि आपत्तीनिवारणासाठी तात्काळ धावून जाऊन  वेळेवर आणि प्रभावी सहाय्य प्रदान करण्याची त्यांची बांधिलकी यामुळे स्पष्ट झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खरीप हंगामामध्ये ‘साथी पोर्टल’ वरून बियाणे वितरण व विक्री

पुणे दि. 24: खरीप हंगाम २०२५ मध्ये सर्व प्रकारच्या...

गायन-वादनाचा सुरेल संगम-पुणेकर रसिकांची भरभरून दाद

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रमपुणे : युवा कलाकार...

अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा:निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार,निधी वाटपावर भाजपचे आमदारही...