Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मविआ ची सुपारी घेतलेल्या नौटंकीबाज माणसापुढे मराठा समाज झुकणार नाही -दरेकर

Date:

बड्या नेत्याची फूस, शरद पवारांवर निशाणा

मुंबई-मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडला आहे. त्यांना आता सत्तेची आस लागलेली आहे. त्यातून ते कोणाची बाजू धरत आहेत, हे अगदी स्पष्ट झालेले आहे. त्यांच्या नौंटकीपुढे मराठा समाज आता झुकणार नाही. दुसरे म्हणजे जरांगेंकडे लोकांची गर्दी कमी झालेली असून लोकांचा पाठिंबा मिळत नाही म्हणून त्यांना प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आता जेलमध्ये जाण्याची घाई झालेली आहे, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

प्रवीण दरेकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्यावरील मराठा समाजाचा विश्वास गेलेला आहे. त्यांची सुरूवातीची भाषा कुणबी नोंदीच्या संदर्भात होती. त्यात देखील सरकारने पुढाकार घेतला. त्यानंतर सगेसोयरेचा विषय आला. त्यावर देखील सरकारने सकारात्मकता दाखविली. त्या दृष्टीने कामे देखील सुरू झालेली आहेत. परंतु, आता महाविकास आघाडीला विधानसभेत कशी मदत होईल, त्या दिशेने जरांगे यांचे पाऊल पडत आहेत.

जरांगेंच्या चर्चेच्या फेऱ्या या आंदोलनातील मागणीसंदर्भात व्हायला पाहिजे. परंतु त्यांच्या फेऱ्या आता राजकारणाच्या भाषेच्या होत आहेत. आंदोलन सुरू झाले तेव्हापासून राजेश टोपे व त्यांचा कारखाना त्या ठिकाणी झालेल्या बैठका यावरुन अगदी चित्र स्पष्ट झाले आहे की, जरांगे यांचा नेमका पाठिंबा कोणाला आहे. परंतु जरांगे यांच्या नौटंकीला आता मराठा समाज झुकणार देखील नाही. माझ्यावर कोणी बोलायचे नाही आणि बोलले तर त्याच्या व्यक्तिगत जीवनावर टीका करायची ही त्यांची अहंकारी भाषा आता मराठा समाजाला देखील कळाली आहे.

मनोज जरांगे यांना आता सत्तेची आस लागलेली आहे. महाविकास आघाडीची सुपारी घेतली असल्याचे त्यांचा विधानातून अगदी स्पष्ट होत आहे. परंतु या नौटंकीबाज माणसापुढे आता मराठा समाज झुकणार नाही, कारण त्यांनी विश्वास गमावलेला आहे, असाही घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला.ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं का महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा माझा देखील प्रश्न आहे. मग जरांगे पाटील हे मविआच्या नेत्यांना का विचारत नाहीत. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर का बोलता, भाजपलाच का सवाल करत आहात. यातून एकच स्पष्ट होते की, जरांगे तुम्ही जे काही मराठा समाजाच्या भावनांशी खेळ मांडला, हे योग्य नाही, असा निशाणा प्रवीण दरेकरांना लगावला.एकीकडे सांगायचे की मला राजकारणाशी घेणंदेणं नाही. दुसरीकडे त्यांच्या मनात व पोटात जे होते ते बाहेर आलेले आहे. कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशासाठी करत आहात. मराठा समाजाने पाठबळ दिले याचा अर्थ कोणालाही काही बोलायचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. आता त्यांच्या आंदोलनामागील सत्य समोर आलेले आहे

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोण फूस देत आहे. हे देखील अगदी स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्रात जबाबदार नेते या मागे आहे, असे म्हणत दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर कोणाला समर्थन आणि कोणाला विरोध हे देखील स्पष्ट झालेले आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगेंचा डाव मराठा समाजाला कळू शकला नाही, त्यामुळे परिणाम वेगळे पाहायला मिळाले. पण मराठा समाज आता दक्ष झालेला आहे, असेही दरेकर म्हणाले.

जरांगे राजकारण ओरिएन्टेड झाले हे मराठा समाजाला खरे रुप दिसले आहे. जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणावर गोळी मारण्याचे काम चालू आहे, हे देखील दिसून येत आहे. मुळात कोर्टाने नोटीस बजावली आहे. परंतु अशी म्हण आहे की, ज्याला काविळ झाली आहे त्याला जग देखील पिवळे दिसते, तशी गत जरांगे यांची झालेली आहे. मुळात अहंकाराची भाषा आता ते बोलू लागले आहेत. सरकार, पोलिस व न्यायालयाला देखील ते मानायला तयार नाही, केवळ फडणवीस यांच्यावर टीका करून चालणार नाही, असे म्हणत जरांगे पाटलांवर दरेकर यांनी निशाणा साधला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...