Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तू काय ठेका घेतलाय का?:हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे कर, प्रसाद लाडांचे जरांगेंना आव्हान

Date:

मुंबई-भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर अक्षरशः एकेरी भाषेत हल्ला चढवला आहे. तू कुणालाही पाडण्याचा ठेक घेतला आहे का? हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे कर, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी जरांगेंना मराठा समाजातून मिळणारा पाठिंबा कमी झाल्याचा दावाही केला. लाड यांच्या टीकेमुळे जरांगे व भाजपतील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी आपल्या बेमुदत उपोषणाला स्थगिती दिली. या घटनाक्रमानंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना मिळणारा पाठिंबा आता कमी झाला आहे. ही बाब त्यांच्याही लक्षात आली आहे. त्यांचे नाटक लोकांच्या समोर येत आहे. भरकटलेले जरांगे आमच्यावर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाहक टीका करत आहेत. पण ते हे सर्व कुणाची सुपारी घेऊन करत आहेत हे जनतेला समजले आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, तु काय ठेका घेतला आहे का याला पाडणार त्याला निवडून आणायचे… एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावे निवडणूक लढवावी आणि आपले 288 उमेदवार उभे करावे असे आव्हान प्रसाद लाड यांनी दिले आहे. मराठा आंदोलनासाठी त्यांनी लढावे, त्यांच्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि राहिल असे प्रसाद लाड यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना हे म्हटले आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, लोकांचे लक्ष विचलित करायचे म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे. अटक वॉरंट हे न्यायालयातून निघत असते. त्यांचा मान सन्मान राखायला पाहिजे. 2013 मध्ये लोकांचे पैसे खाल्ले असेही लाड यांनी म्हटले आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, निजामाने मनोज जरांगे यांना काय सर्टीफीकेट दिले आहे का कोण मराठा आहे की नाही हे ठरवण्याचे. तर मनोज जरांगे पाटील दादा आता हे मोघलाई कडे निघाले आहेत. ते राजकारणात चाले हे आता स्पष्ट झाले आहे. मी जातीवंत मराठा आहे. माझ्या पणजोबाच्या नोंदी सापडल्या त्यामुळे आम्ही ओबीसी झालो. मनोज जरांगे यांचे पण सर्टीफीकेट सापडले. मग तुम्ही त्यांना विचारा ते मराठा आहेत की ओबीसी?, असे लाड यांनी म्हटले आहे.

मनोज भाऊ तुम्ही काल सुद्धा प्रविण दरेकर यांचे रक्त चेक करा असे बोलले. तुमच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही. माझ तुम्हाला पुन्हा आवाहन आहे तुम्ही चर्चेला या. तुम्हांला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल आरक्षण मान्य नाही का? त्यांनी कोर्टात आरक्षण टिकवले मान्य नाही का? असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...