दुष्काळी आपत्तीचा सामना आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर

Date:

नागपूर, दि. ७:  कुठलेही संकट अथवा आपत्ती आल्यास तिचा सामना कशा पद्धतीने करायचा यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडलेले विचार मागील अनेक पिढ्यांसाठी  आत्मिक बळ देणारे ठरले आहेत. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेच्या निमित्ताने शनिवारी रात्री नेमक्या याच विचारांचा जागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासोबत साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. लोहारी सावंगा गावात दाखल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  गावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले. त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकुर, आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी तसेच गावचे सरपंच सतीश चापले हे देखील या प्रार्थना सभेत सहभागी झाले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रार्थना सभेत मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाच्या भजन मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजनांनी वातावरण भारून गेले होते. संकटाच्या काळात मानवी मनांना उभारी देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित या भजनांनी गावात एका आश्वासक वातावरणाची निर्मिती झाल्याचे चित्र अत्यंत भारावून टाकणारे होते.

राष्ट्रसंतांना वंदन करून या प्रार्थना सभेची सुरुवात झाली. त्यानंतर मौन प्रार्थना आणि राष्ट्रवंदना घेण्यात आली. यानंतर गुरुकुंज मोझरीच्या भजन मंडळाच्या वतीने ‘शेतकऱ्यांनो कामकर्‍यांनो..’, ‘मेरे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरणादायी भजने सादर करण्यात आली. गुरुकुंज आश्रम मोझरी येथील भजन मंडळाचे अमोल बांबल, शितल मांडवगडे, गजानन गायकवाड, चेतन अंभोरे, सागर भालचक्र, आकाश वानखडे, श्रावण सोनटक्के यांच्या चमूने ही भजने सादर केली. राष्ट्रवंदनेने या प्रार्थना सभेची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी; सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

मुंबई- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व...

तवांग, अरुणाचल प्रदेशमधील शाक्यमुनि बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे 31,000 भक्तांनी घेतले आशीर्वाद

तवांग मठातील सात दिवसांच्या प्रदर्शनाचा 7 नोव्हेंबर रोजी समारोप;...

दिवाळीनिमित्त २० क्विंटल फुलांनी सजले केदारनाथ मंदिर; देशभरात दीपोत्सवाचा उत्साह!

केदारनाथ धाममध्ये आकर्षक पुष्पसजावट, अयोध्येत लाखो दिव्यांची रोषणाई; राष्ट्रपती,...