पंढरपूरच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाहीचा झेंडा रोवणाऱ्या विचारांच दर्शन म्हणजे संत चोखामेळा समता पुरस्कार

Date:

कामगार नेते रघुनाथराव कुचिक 
पुणे : भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाने पंढरपूर च्या वाळवंटात सर्व समाज घटकातील संताना एकत्र आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना करत समता, बंधुता व मानवता या मूल्यांची अनमोल भेट समाजाला दिली. वारकरी संप्रदायाच्या याच समाजहितैशी मूल्यांचे संत चोखामेळा समता पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वाच्या कार्यात दर्शन घडते आहे . असे प्रतिपादन पुढे बोलतांना कामगार नेते रघुनाथराव कुचिक यांनी केले .संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने संत चोखामेळा महाराज यांच्या ६८६ व्या पुण्यतिथी संजीवन समाधी दिन निमित्ताने आयोजित संत चोखामेळा समता समता पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते . वारकरी संतांनी कृतीशील आचरणाद्वारे सांगितलेल्या सामाजिक एकता , बंधुभाव अन मानवतावादी मूल्यांना केंद्रस्थानी मानून सामाजिक एकतेसाठी अविरतपणे  कार्यरत असलेले संत चोखामेळा महाराज जन्मभूमी मेहुणाराजा जि बुलढाणा येथील संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याचे प्रणेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ( बुलढाणा ) व संत विचारांचा  जागर आधुनिक माध्यमाद्वारे अधिक समर्थपणे करणारे लोकप्रिय कीर्तनकार प्रवचनकार महंत ह भ प पुरुषोत्तमदादा पाटील (आळंदी )  यांना संत चोखामेळा समता पुरस्कार देउन ह भ प दिपकजी महाराज व रघुनाथराव कुचिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र ,शाल , पुष्पगुच्छ , श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले , पुणे विद्यापीठ पुणे च्या संत ज्ञानदेव , संत नामदेव व संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रो .डॉ. ओम श्रीश श्रीदत्तोपासक होते . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणजे ज्येष्ठ विचारवंत , माजी खासदार  प्रो .डॉ. सुनीलराव गायकवाड , उपस्थित होते . उद्योजक अण्णासाहेब वावरे , साहित्यिक श्यामसुंदर मुळे आदी मान्यवर उपस्थित होते . 
ज्येष्ठ गांधीवादी आ.हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना त्यांच्याच संकल्पनेतुन संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याची बुलढाणा जिल्हा परिषद यांच्या वतीने मेहुणाराजा येथे सुरुवात झाली , यास यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. सपकाळ यांनी आत्यंतिक श्रद्धेने सुरु केलेला जन्मोत्सव सोहळा आज मोठया प्रमाणात साजरा होतो. प्रतीवर्षी राज्यातील चोखामेळा भक्त , अभ्यासक संशोधक या सोहळ्यास हजेरी लावतात , संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळा सोबतच संत चोखामेळा महाराज व कुटूंबातील अन्य संतांच्या  विचार संवर्धन उत्कर्ष कार्यात सपकाळ सक्रिय असतात त्यांच्या संत चोखामेळा यांच्या विचार प्रसार कार्याबद्दल त्यांना  संत चोखामेळा समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले .    सोबतच  वारकरी संप्रदायातील लोकप्रिय कीर्तनकार प्रवचनकार ह भ प श्री महंत पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीकर  हे आधुनिक माध्यमाद्वारे वारकरी विचारांचा सातत्याने प्रचार प्रसार  करत असतात , तरुण पिढीस समजेल अशा साध्या सोप्या भाषेतील मांडणीद्वारे ते संत विचार घेउन प्रबोधन करत आहेत . संत चोखामेळा समता पुरस्कार देउन ह भ प पुरुषोत्तम पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले . पाटील महाराज हे आळंदी येथील श्री सद्गुरु अमृता स्वामी मठाचे विद्यमान मठाधिपती आहेत तसेच झी टॉकीज वरील कीर्तन मालिका गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा व मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार आहेत . ह भ प पुरुषोत्तमदादा पाटील यांना आध्यात्मिक तर आ.  हर्षवर्धनदादा सपकाळ यांना सामाजिक गटातून संत चोखामेळा समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत चोखामेळा अध्यासनाचे संस्थापक सचिन पाटील यांनी तर आभार ह भ प वसंतराव आण्णा पवार महाराज यांनी तर निवेदन ज्येष्ठ विश्वस्त ह भ प प्रसाद माटे महाराज यांनी केले .       वारकरी संतांनी सांगितलेल्या मार्गाने जनसेवेच्या कार्यात प्रामाणिकपणे गढून गेलेल्या व्यक्तीमत्वाच्या गौरव सोहळ्यास मुंबई , पुणे , सोलापूर , बुलढाणा ,सातारा , धाराशिव लातूर आदी जिल्ह्यातून संत चोखामेळा प्रेमी उपस्थित होते . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेचा लोहगावच्या 7 RMC प्लांटवर जोरदार हथोडा

पत्रकार परिषद घेऊन पुणे आरएमसी असोसिएशनने दिला होता इशारा...

ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचा घटना हे अपयश फडणविसांचे…

मुंबई, दि. १५ एप्रिल २०२६ महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे...

“महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश”

सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार...