· आयएसआरएलचा दुसरा सीझन जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान ६० दिवस चालणार असून चाहत्यांना थरारक सुपरक्रॉसचा जास्त काळासाठी आनंद घेता येईल.
· दुसऱ्या सीझनमध्ये रेसिंगच्या आकर्षक फॉरमॅट्सचा समावेश, रेसेस आणि नवीन स्टेडियम्सची संख्या वाढवणार
· दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी रायडर्सची नोंदणी जून २०२४ अखेर सुरू होणार
· दुसऱ्या सीझनसाठीचा रायडर्स ऑक्शन ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू होणार
· सीएट दुसऱ्या सीझनसाठीही आयएसआरएलबरोबर भागिदारी कायम राखणार
मुंबई, १४ मे २०२४ – उद्घाटनपर सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने (आयएसआरएल) मोटरस्पोर्ट्स कम्युनिटीमध्ये जागतिक स्थान निर्माण केले असून ही लीग जगातील वेगाने विकसित होत असलेल्या मोटरस्पोर्ट्स लीगपैकी एक मानली जाते. याचा बहुप्रतीक्षीत दुसरा सीझन जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार असून तो मार्च २०२५ पर्यंत चालणार असल्याचे घोषित करताना लीगला आनंद होत आहे. जगातील पहिली फ्रँचाईझी- बेस्ड सुपरक्रॉस रेसिंग सीरीज या नात्याने आयएसआरएल रेसिंगचा थरार ६० दिवसांच्या सीझनसह नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे.
सीएट आयएसआरएलचा दुसरा सीझन थरारक होईल यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून रेसेसची संख्या वाढवण्यात आली आहे, तर नवे स्टेडियम्स देशभरातील मोटरस्पोर्ट्स प्रेमींचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. आगामी सीझनसाठी रायडर्सची नोंदणी जून २०२४ च्या अखेरीस सुरू होणार आहे. भारतातील या सर्वात थरारक रेसिंग इव्हेंटमध्ये स्पर्धा करण्यासाठी जगभरातील रायडर्स उत्सुक आहेत. दुसऱ्या सीझनसाठीचे रायडर ऑक्शन ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार आहे.
‘सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या सीझनची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सह- संस्थापक आणि संचालक श्री. वीर पटेल म्हणाले. ‘उद्घाटनपर सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आगामी सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जगभरातील रायडर्सकडून आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत असून ते सीएट आयएसआरएलची वाढती लोकप्रियता व प्रतिष्ठेचे निदर्शक आहे.’
सीएटचे प्रमुख विपणन अधिकारी श्री. लक्ष्मी नारायण बी म्हणाले, ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगसह आमच्या भागिदारीला उद्घाटनपर सीझनमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. या भागिदारीसाठी आम्ही बांधील असून तिच्या यशाची आम्हाला खात्री वाटते. पहिल्या सीझनमध्ये तयार झालेली उत्सुकता व उत्साह लक्षणीय होता व त्यामुळे भारतात आतापर्यंत कधीही न पाहिलेला प्रेक्षकवर्ग तयार झाला. आम्ही आता आणखी मोठ्या आणि उत्कंठावर्धक दुसऱ्या सीझनसाठी उत्सुक आहोत.’
पहिल्या सीझनला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन सीएट आयएसआरएल सीझन २ आणखी व्यापक, धाडसी व वेगवान करण्यात येणार आहे. त्यामध्ये रेसेसची विस्तारत श्रेणी तसेच नव्या स्टेडियम्सचा समावेश करत चाहत्यांना अविस्मरणीय अनुभव देण्याचे ध्येय आहे. अनोखे फ्रँचाईझी- बेस्ड मॉडेल आणि नाविन्याप्रती बांधिलकी यांसह सीएट आयएसआरएल सुपरक्रॉस रेसिंग क्षेत्राच्या मर्यादा पार करत मोटरस्पोर्ट्स उद्योगातील आघाडीची शक्ती म्हणून आपले स्थान बळकट करण्यासाठी उत्सुक आहे.
इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगविषयी (आयएसआरएल) अधिक माहिती व अपडेट्ससाठी भेट द्या – https://indiansupercrossleague.com/