Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केपी मधील हॉटेल ,बार,जिम असे ५०हजार चौरसफुटाचे बेकायदा बांधकाम उध्वस्त

Date:

पुणे- कोरेगाव पार्कातील हॉटेल ,बार,जिम असे सुमारे ५०हजार चौरसफुटाचे बेकायदा बांधकाम उध्वस्त करण्याची मोठी कारवाई आज पुणे महापालिकेने केली आहे.

पुणे पेठ कोरेगाव पार्क येथील संगमवाडी टीपी स्कीम अंतिम भूखंड क्रमांक ४०५ येथे अनधिकृतरित्या विकसित करण्यात आलेल्या हॉटेल्स व इतर कच्च्या व पक्क्या स्वरूपाच्या बांधकामावर दिनांक ०५/०६/२०२४ रोजी बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ कडून कारवाई करण्यात आली या बांधकामास दि. ३१/१२/२०२० रोजी नोटीस देण्यात आली होती परंतु या नोटीस बाबत सदर वादी यांनी मनपा कोर्टात दावा दाखल केला या दाव्याबाबत न्यायालयाचा निकाल प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने लगेच कारवाई हाती घेतली व पूर्ण केली परंतु वादी यांनी कारवाई झाल्यानंतर कोर्टाकडून स्टे घेतला व पुन्हा सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम विकसित करून नव्याने हॉटेल व इतर व्यावसायिक वापर चालू केले याबाबत नागरिकांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने सर्वांना ज्ञात करून व महापालिकेच्या विधी विभागा सोबत कायदेशीर बाबत सल्ला मसलत करून नव्याने विकसित केलेल्या बांधकामास नोटीस दिली व कारवाई केली. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम करून हॉटेलचा वापर चालू केला होता जागेवर कोणतीही अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना व पार्किंगची सोय नसल्याने येथे सार्वत्रिक सुट्ट्या च्या काळात तसेच अन्य दिवशी वाहतुकीस अडथळा येत होता. कारवाई सुरू करताना संबंधित व्यावसायिकांनी कारवाईस रोष दर्शविला त्यानुसार स्थानिक पोलीस यंत्रणा व संबंधित उपायुक्त पोलीस व सहाय्यक आयुक्त पोलीस यांना संपर्क साधला असता कायदेशीर बाबीमुळे कारवाई सुरू करण्यास विलंब झाला परंतु नंतर पोलीस बंदोबस्तात कारवाई पूर्ण करण्यात आली यासाठी जॉ-कटर, जेसीबी इत्यादी आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला या कारवाईसाठी खालील प्रमाणे मनुष्यबळ व साधन सामग्री वापरण्यात आली.
१) उप अभियंता व बांधकाम विभागाकडील सेवक वर्ग – एकूण १३ सेवक
२) मनपाकडील अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी व एम एस एफ चे जवान – एकूण १८ सेवक
३) स्थानिक अधिकारी व पोलीस कर्मचारी एकूण २२ सेवक
४) वापरण्यात आलेली साधनसामग्री
१) जॉ कटर – १
२) जेसीबी – ६
३) गॅस कटर – २
५) कारवाईदरम्यान खालील बांधकाम निष्कासित करण्यात आली
१. हॉटेल चूल मटण –
२. हॉटेल बारमंका कॅफे किचन –
३. पूजा फ्रुट अँड व्हेजिटेबल –
अंदाजे २५ मी X १५ मी १८ मी X ५ मी ४६५ चौमी प्लास्टिक- फॅब्रीक शेड व फॅब्रीकेशन शेड
अंदाजे २२ मी x २५ मी ५५० चौमी फॅब्रीकेशन सह प्लास्टिक-
पत्राशेड व विटाचे बांधकाम.
अंदाजे ५ मी X ३ मी १५ चौमी पत्रा शेड

४. लजिज चिकन सेंटर –
अंदाजे ४ मी X ३ मी १२ चौमी पत्रा शेड
५. पत्रा खोल्या –
अंदाजे १५ मी X ४ मी X २ नग १२० चौमी पत्रा खोल्या
६. पालमोको डाईन, ड्रिंक, डान्स
अंदाजे २५ मी X २० मी ५०० चौमी पत्रा शेड व अंदाजे २० मी X ३६ मी = ७२० चौमी प्लास्टिक फॅब्रीक व फॅब्रीकेशन शेड
७. क्रिकेट टर्फ व शेड –
अंदाजे ३५ मी X २७ मी अंदाजे १६ मी X १२ मी ९४५ चौमी नेट व फॅब्रीकेशन फ्रेम वर्क/टर्फ व १९२ चौमी पत्रा शेड
८. मसल बार जिम –
अंदाजे ४० मी X २० मी बांधकाम ८०० चौमी फॅब्रीकेशन सह पत्राशेड व विट
एकूण क्षेत्रः ४६,५०० चौ. फुट

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...