Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एअर इंडियाने प्रवाशांना बुकिंगमध्ये अधिक लवचिकता येण्यासाठी ‘फेअर लॉक’ची सुविधा दिली

Date:

गुरुग्राम, 05 जून 2024: भारतातील आघाडीची जागतिक विमान कंपनी एअर इंडियाने ग्राहकांसाठी ‘फेअर लॉक’ ही अनोखी सुविधा आणली आहे. airindia.com आणि Air India मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तिकीट काढणाऱ्या ग्राहकांसाठी हे एक नवीन वैशिष्ट्य आहे, जे प्रवाशांना प्रवासाची अधिक सहज आणि सोयीस्कर आखणी करण्यास मदत करते.

फेअर लॉक या सुविधेअंतर्गत ग्राहक एखादा तिकीट दर निश्चित, नाममात्र शुल्कासाठी 48 तासांसाठी लॉक इन किंवा आरक्षित करू शकतात. या काळात ते त्यांचा प्रवास निश्चित करू शकतात. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होते. कारण तिकीट दर लॉक केल्याने दरवाढीचा फटका टळतो तसेच आपल्याला हव्या असलेल्या फ्लाईटने प्रवासही करता येतो. बुकिंगच्या तारखेपासून किमान 10 दिवस ही सुविधा उपलब्ध आहे.

ही सुविधा घेण्यासाठी एअर इंडियाच्या ग्राहकांना त्यांच्या सर्वाधिक पसंतीचे फ्लाइट पर्याय निवडणे आवश्यक आहे. बुकिंग फ्लोमध्ये फेअर लॉक पर्याय निवडा यासाठी नॉन रिफंडेबल शुल्क भरावे लागेल. ‘मॅनेज बुकिंग’ हा पर्याय वापरून ग्राहक आधीच -निवडलेल्या तिकीट दराच्या साहाय्याने त्यांच्या बुकिंगचे कन्फर्मेशन करू शकतात. यासाठी वेबसाइट किंवा मोबाइल ॲप असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

फेअर लॉक खालील शुल्कांवर उपलब्ध आहे (करांसह) मार्गानुसार त्यात बदल होतो. हा दर प्रत्येक प्रवासी प्रति तिकीट लागू होते:

फ्लाईटचा प्रकारभारतातून जाणाऱ्या फ्लाईट्स भारतात येणाऱ्या फ्लाईट्सभारतातून जाणाऱ्या फ्लाईट्स भारतात येणाऱ्या फ्लाईट्स
देशांतर्गत उड्डाणेINR 500INR 500
शॉर्ट-हॉल्ट आंतरराष्ट्रीयINR 850USD 10
लांब पल्ल्याची आंतरराष्ट्रीयINR 1500USD 18

एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांमध्ये सहाय्यक ऑफरिंगच्या वाढत्या पोर्टफोलिओतील फेअर लॉक हे अनोखे फीचर आहे. ग्राहकांना प्रवासाचा उत्तम अनुभव येण्यासाठी याची रचना केली आहे. यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासोबतच बुकिंग फ्लोमध्ये Amadeus सोबत एकत्र आले आहेत. एअर इंडिया आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याला नेहमीच प्राधान्य देते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताचा हिंदूू पाकिस्तान होऊ देऊ नका:माणूस म्हणून एक यायला हवे _परुळेकर

दहशतवाद्यांनी देशावर भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध करावा तेवढा...

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग ॲकॅडमीच्या कलाकारांचा नृत्याविष्कार

पुणे : भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जनतेसमोर यावा, वारशाचे...

पहलगाम हल्ला ! खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा पाकला खुला पाठिंबा

Pahalgam attack । पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत...

फॉरेस्ट पार्क येथील तीनशे मीटर चा रस्ता करण्यासाठी आमदार पठारे यांचा उपोषणाचा इशारा

पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील पुणे-नगर रस्ता ते लोहगाव-वाघोली रस्त्याला फॉरेस्ट...