पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांची जादु चालली आहे.पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं. तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणेच धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले.