पुणे- जैन श्वेतांबर मूर्तिपूजक गुजराथी समाजाचा उच्चशिक्षित वधु-वर परिचय मेळावा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा 16 जून रोजी होणार आहे.हा सोहळा पुण्यातील कोंढवा येथील नंदुभवन हॉल येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील व भारतातील उच्चशिक्षित मुले व मुलीची नावनोंदणी 25 मे पर्यंत करावी, असे आवाहन जैन श्वेतांबर समाजाचे पिंपरी-चिंचवड स्थानिक प्रतिनिधी किरण शहा यांनी केले आहे.जैन वधुवर परिचय संस्था, पुणे यांच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.या संस्थेच्या वतीने 19 वा उच्चशिक्षित वधू-वर परिचय मेळावा आयोजित(Pune) करण्यात आला आहे. त्यासाठी समाजातील उच्च शिक्षित मुलामुलींची नोंदणी समाज बांधवांनी 25 मे पूर्वी खालील वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने करावी,असे आवाहन किरण शहा यांनी केले आहे.
www.jainvadhuvarsansthapune.com या वेबसाईटवर उच्च शिक्षित मुलामुलींची नोंदणी करावी. तसेच,अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष दिलीप मेहता 9822079015 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.